Nilesh Lanke : महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या (Nilesh Lanke) प्रचारासाठी आज दुपारी शेवगावात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी तयार करण्यात आलेल्या बॅनरवरून महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत. या बॅनरवर दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि राजीव राजळे यांचे फोटो आहेत. हीच बाब भाजपला खटकली आहे. त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे. वि्ष्णूपंत अकोलकर यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर आता महाविकास आघाडीच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Ahmednagar News : धमक्यांना मी घाबरत नाही…जनता त्यांना उत्तर देईल…विखेंचा लंकेंना टोला
नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी आज दुपारी महाविकास आघाडीतर्फे शेवगाव शहरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. या सभेची माहिती लोकांना व्हावी यासाठी मोठेमोठे बॅनर तयार केले आहेत. या बॅनरवर चक्क भाजप दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि राजीव राजळे यांचे फोटो अगदी ठळकपणे लावण्यात आले आहेत. सभा महाविकास आघाडीची पण फलकात फोटो भाजप नेत्यांचे हे कोडं सामान्य जनतेच्या पटकन लक्षात येत नसलं तर भाजपाच्या आलं.
या नेत्यांचे फोटो लावून महाविकास आघाडीचा काहीतरी वेगळाच डाव दिसतोय हे लक्षात आल्यानंतर लागलीच निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली. या सभेचे नियोजन राष्ट्रवादीचे स्थानिक नेते प्रताप ढाकणे यांच्याकडून केले जात आहे. सभेसाठी मोठे बॅनर तयार करण्यात आले आहे. या बॅनरवर भाजप नेत्यांचे फोटो वापरण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.