Sujay Vikhe Challenges Nilesh Lanke : राज्यात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक चर्चेत आहे. यंदा येथील लढत लक्षवेधी ठरणार आहे. याचं कारण म्हणजे भाजप खासदार सुजय विखे यांच्यासमोर निलेश लंकेंचं आव्हान आहे. राज्यात या निवडणुकीकडे विखे विरुद्ध पवार अशीच लढत म्हणून पाहिले जात आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली. प्रचारादरम्यान एका मेळाव्यात सुजय विखे यांनी निलेश लंके यांना थेट आव्हानच देऊन टाकले. मी जेवढी इंग्रजी बोलल तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असे आव्हान सुजय विखे यांनी दिले.
नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या सुरुवातीलाच विखे यांनी संसदेतील त्यांच्या इंग्रजी भाषणाचा एक व्हिडिओ दाखवला. याचाच आधार घेत सुजय विखे यांनी निलेश लंकेंना आव्हान दिले. महिनाभरात त्यांनी हे इंग्रजीतील भाषण पाठ करून म्हणून दाखवावं असे आव्हान दिले.
दरम्यान भाजपकडून आमदार राम शिंदे हे देखील लोकसभेसाठी इच्छुक होते मात्र पक्षाकडून सुजय विखे यांना उमेदवारी ही जाहीर झाली. त्यानंतर शिंदे हे नाराज असल्याचे चर्चा देखील समोर आल्या होत्या. देखील एका कार्यक्रमाद्वारे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींची देखील माफी मागितली होती. त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे यांनी देखील मंत्री राम शिंदे यांची भेट घेत शिंदे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सोशल मीडियावर देखील पोस्ट सुरु झाल्या आहेत. त्यामुळे मतदारसंघात अटीतटीची लढत होणार हे निश्चित झाले आहे.
Ahmednagar : सुजय विखेंसाठी नगरकरांचं ठरलंय; भाजप नेत्याच्या वक्तव्याने वेगळीच चर्चा…