Download App

Road Accident : नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू

Road Accident : राज्यात रस्ते अपघातांची संख्या सातत्याने वाढत चालली (Road Accident) आहे. आताही अशीच भीषण दुर्घटना नगर जिल्ह्यात (Ahmednagar) घडली आहे. नगर-कल्याण महामार्गावरील ढवळपुरी फाटा परिसरात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. नगर-कल्याण महामार्गावर उस वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर व ठाणे–मेहकर एसटी बस आणि इको गाडी यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास ढवळपुरी फाट्यानजीक हा अपघात झाला. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

दरम्यान मृतांमधील पाच मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात तर एकाचा नगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच सहायक पोलिस निरिक्षक प्रमोद वाघ व त्यांचे पथक हे तातडीने घटना स्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्यात आली. आपघातग्रस्त वाहने बाजूला केली असून वाहतूक सुरळीत झाली आहे. दरम्यान अपघातग्रस्तांची ओळख पटविण्याचे काम चालू असल्याचे सांगण्यात आले.

Road Accident : बीडमध्ये पिकअप-कंटेनरचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू

रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे.

follow us