‘अदानींची गाडी कर्जत-जामखेडला का वळवली नाही?’ राम शिंदेंचा पवारांना खोचक सवाल

Ram Shinde vs Rohit Pawar on Karjat MIDC : कर्जत एमआयडीसीवरून आमदार रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यातील वाद अजूनही मिटलेला नाही. या मुद्द्यावर दोघांत आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरुच आहे. रोहित पवार यांनी टीका केल्यानंतर आता आमदार राम शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काही दिवसांपूर्वी उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतली […]

Ram Shinde

Ram Shinde

Ram Shinde vs Rohit Pawar on Karjat MIDC : कर्जत एमआयडीसीवरून आमदार रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यातील वाद अजूनही मिटलेला नाही. या मुद्द्यावर दोघांत आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरुच आहे. रोहित पवार यांनी टीका केल्यानंतर आता आमदार राम शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काही दिवसांपूर्वी उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी गाडी रोहित पवार यांनी चालवली होती. या प्रसंगावर राम शिंदे यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे.

सांगलीत केसीआर यांची ताकद वाढली! शेतकरी संघटनेचा बडा नेता बीआरएसमध्ये…

मीडियासमोर या चर्चा करू असे आव्हान रोहित पवार यांनी दिले होते. त्यावर शिंदे म्हणाले, मीडियासमोर यायला काहीच हरकत नाही. टिव्हीवर डिबेट सुरू करा. कुठे पाहिजे तिथे चर्चा करू मी तीन मुद्दे सांगितले आहेत. नीरव मोदींनी माझ्या काळात जमीन खरेदी केली, तर केली. माझ्या काळात खरेदी केलेली जमीन तु्म्ही हस्तगत केली. तुमचं काय कनेक्शन आहे. तुम्ही अदानीची गाडी चालवता, खूप उद्योग धंदे आणलेत मग त्यांची गाडी कर्जत-जामखेडकडे का वळवली नाही, असा खोचक सवाल शिंदे यांनी केला.

तुम्ही सगळीकडे प्रसिद्धी मिळवली. अदानी तुमचं ऐकतात. अदानी मोठे आहेत. त्यांनी उद्योग आणले. तर मग ती गाडी तुम्ही जामखेडकडे का वळवली नाही. एमआयडीसी तर होती तिथे असे शिंदे म्हणाले.

कर्जत MIDC वादात नवा ट्विस्ट! रोहित पवारांनी टाळलं राजकीय क्रेडिट; शिंदेंनाही सुनावलं

रोहित पवार काय म्हणाले ?

आज सत्तेत आलात आणि तु्म्ही जर क्रेडिट घेणार असाल तर जरूर घ्या. ज्या एमआयडीसीचा पाठपुरावा त्यांनी नाही तर मी केला. त्याचं क्रेडिट त्यांना घ्यायचं असेल तर त्यांनी जीआर हातात घ्या, फोटो काढा, बातम्या छापा पण ते तरी करा. त्यांनी पाठपुरावा केला असेल तर पुढे या आपण मीडियासमोर चर्चा करू असे मी म्हणालो होतो पण ते काही पुढे आले नाहीत. त्यांना क्रेडिट घ्यायचं असेल तर घ्या मला राजकीय क्रेडिट घ्यायचं नाही. मला फक्त सामान्य लोकांच्या मुलांना त्यांच्या हाताला काम मिळवून द्यायचं आहे. हे जर तुम्ही (राम शिंदे) क्रेडिट घेऊन होणार असेल तरी काही हरकत नाही.

Exit mobile version