Ahmednagar Politics : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीची (BRS) महाराष्ट्रात एन्ट्री झाली आहे. नगर जिल्ह्यात या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला पहिला मोठा हादरा दिला आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते घनश्याम शेलार यांनी काल हैदराबाद येथे चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांची भेट घेत बीआरएसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या पक्ष प्रवेशानंतर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली. त्यांच्या प्रमाणेच आणखीही काही नेते बीआरएसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. पाथर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रताप ढाकणे (Pratap Dhakane) यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, खुद्द ढाकणे यांनीच या चर्चांचे खंडण केले. तसेच हा पक्ष कोणता, मला तर ‘बीआरएस’चा फुल फॉर्म सुद्धा माहिती नाही, असे उत्तर दिले.
ढाकणे यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. याबाबत लेट्सअप मराठीने प्रताप ढाकणे यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले, की ‘मी माझ्या मतदारसंघात आहे. मतदारसंघात कार्यक्रम करतो आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा काहीच प्रश्न नाही. या सगळ्या अफवा आहेत. माझ्या गावाशेजारील एक तरुण पोरगा बीआरएसच्या महाराष्ट्राच्या कोअर टीममध्ये आहे. तिथल्या मुख्यमंत्र्यांनी त्याला ऑफिसमध्ये कामाला ठेवले आहे, असे मला समजले आहे. तो माझ्या मतदारसंघातला असल्याने मी देखील बीआरएसमध्ये जाणार अशा चर्चा सुरू झाली असावी. त्यामुळेच माझ्याबद्दलच्या अशा अफवा उडालेल्या असाव्यात. मात्र तसे काहीही नाही. मी माझ्या मतदारसंघात तळ ठोकून आहे. त्यामुळे मी भारत राष्ट्र समितीत जाण्याचा काही प्रश्नच नाही’, असे ढाकणे यांनी स्पष्ट केले.
नगरमध्ये बीआरएसचे राष्ट्रवादीला खिंडार
आहे. त्यातच आता भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर नंतर अहमदनगर जिल्ह्यात पक्षाने हातपाय पसरले आहेत. काल नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते घनश्याम शेलार यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने त्यांचा हा पक्ष प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. शेलार यांच्यानंतर आणखीही काही नेते बीआरएसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, जिल्ह्यात अद्याप तशा काही हालचाली दिसत नाहीत.
अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला दणका बसणार : तीन बडे नेते BRS च्या वाटेवर
बीआरएसचे मिशन विदर्भ
भारत राष्ट्र समितीसाठी पक्ष विस्ताराच्या दृष्टीने महाराष्ट्र महत्वाचा आहे. त्यासाठीच येथे जास्तीत जास्त नेते मंडळी पक्षात घेऊन निवडणुकीआधी पक्ष बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे. आता पक्षाने नागपूर येथे पक्ष कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला असून आज तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.