राष्ट्रवादीला खिंडार; घनशाम शेलारांचा ‘बीआरएस’ मध्ये प्रवेश

राष्ट्रवादीला खिंडार; घनशाम शेलारांचा ‘बीआरएस’ मध्ये प्रवेश

Ghanshyam Shelar : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने आता अहमदनगर जिल्ह्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम आण्णा शेलार यांचा हैद्राबाद येथे बीआरएस पक्षात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.

शेलार यांनी आतापर्यंत अनेक पक्ष बदलले आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी असा प्रवास करत शेलार आता बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. अजित पवार यांचे विश्वासू समजले जाणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी हैद्राबादमध्ये बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. बीआरएसमध्ये प्रवेश केल्याची माहिती घनश्याम शेलार यांनी दिली आहे.

Bharat Gogavale : ‘बेडूक फुगतो की सुजतो हे ‘तेव्हा’ कळेल; बोंडेंच्या टीकेच्या टीकेला गोगावलेंचं प्रत्युत्तर

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल जगताप आणि अनुराधा नागवडेंनी रिंगणातून माघार घेतल्यानंतर शेलार यांनी राष्ट्रवादीकडून २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवत 98 हजार मते घेतली होती. ते साडेचार हजार मतांच्या फरकाने आमदार बबनराव पाचपुते यांच्याकडून पराभूत झाले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत देखील पक्ष त्यांनाच उमेदवारी देईल असे ग्रृहित धरुन त्यांनी मतदारसंघात संपर्क कायम ठेवला आहे.

मात्र त्यांचे पक्षांतर्गत स्पर्धक माजी आमदार राहुल जगताप यांची नुकतीच रयतच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड होऊन जगताप यांचे राष्ट्रवादी पक्षात वाढणारे वजन शेलारांसाठी अडचणीचे ठरत असतानाच रयतच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड करत विधानसभेची उमेदवारीही जगतापांनाच देण्याचे संकेत राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी दिल्याने शेलार अस्वस्थ झाले होते.
ज्यांच्यामुळे भाजप आणि शिंदेंचे भिनसले, ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याची प्रॉपर्टीच अजितदादांनी वाचली

दरम्यानच्या काळात ‘बीआरएस’कडून पक्षप्रवेशाची ‘ऑफर’ आल्याने शेलार आणि ‘बीआरएस’मध्ये प्रवेशाबाबत बोलणी सुरू होती. अंतिम चर्चेसाठी शेलार यांनी आज मंगळवार दि.१४ रोजी ‘केसीआर’ यांची हैद्राबाद येथे कार्यकर्त्यांसह भेट घेत भारत राष्ट्र समिती पक्षात पंचायत समितीचे माजी सभापती विलास भैलूमे, राष्ट्रवादीचे संजय आनंदकर, चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार, श्याम जरे आदी कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube