ज्यांच्यामुळे भाजप आणि शिंदेंचे बिनसले, ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याची प्रॉपर्टीच अजितदादांनी वाचली

ज्यांच्यामुळे भाजप आणि शिंदेंचे बिनसले, ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याची प्रॉपर्टीच अजितदादांनी वाचली

Ajit Pawar on PI Shekhar Bagde : ठाणे जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. भाजप-शिवसेनेच्या वादाची सुरुवात देखील त्यांच्यापासूनच झाली होती. आज विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शेखर बागडे (PI Shekhar Bagde) यांच्याकडील बेहिशेबी मालमत्तेची लिस्टच वाचून दाखवली. एका साध्या पोलीस ऑफिसरकडे एवढी मालमत्ता कशी काय असू शकते? असा सवाल करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

शेखर बागडे चर्चेत येण्याचे कारण?
ठाण्यातील भाजप नेते नंदू जोशी (Nandu Joshi) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. यानंतर भाजप नेत्यांना सहकार्य करत नाहीत म्हणून शेखर बागडे यांच्याविरोधात भाजपने मानपाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. बागडे यांनी नंदू जोशी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप आहे.

Letsupp poll : एकनाथ शिंदेंकडून फडणवीसांचा पाठलाग, दोघांत फक्त 4 टक्क्यांचा फरक

शेखर बागडेंमुळे भाजप-शिवसेनेत वादाची ठिणगी
शेखर बागडे यांनी नंदू जोशी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. जोपर्यंत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेना शिंदे गटाला सहकार्य करणार नाही असा ठराव करण्यात आला. यानंतरच श्रीकांत शिंदे यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता.

अजित पवारांनी काय आरोप केलंत?
पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप करत त्यांच्या प्रॉपर्टीची लिस्ट वाचून दाखवली. अजित पवार म्हणाले की नाशिकमध्ये जमिन, व्यावसायिक गाळे, फ्लॅट्स, नवी मुंबईत मोक्याच्या जागी त्यांच्या सदनिका आहेत. एवढी सगळी मालमत्ता कशी जमवली? असा सवाल करत अजित पवार यांनी शेखर बागडे यांच्या चौकशीची मागणी केली आहे. तसेच पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांच्याकडे 6 कोटींची रोख रक्कम सापडली. सरकारचा प्रशासनावर कोणताही धाक नसल्याने अधिकाऱ्यांची सर्रास भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत असल्याची टीका अजित पवार यांनी केली.

कॅबिनेट दर्जा मिळूनही बच्चू कडू नाराजचं; थेट मंत्रालयातून करणार शिंदे-फडणवीसांची कोंडी

अजित पवारांनी वाचली लिस्ट
शेखर बागडे यांची देवळाली कॅम्प येथे तीन मजली व्यावसायिक मालमत्ता आहे, निवासी फ्लॅट सुमंगल रेसिडन्सी, तिरुमल्ला हाईटस येथे दुकान आणि व्यावसायिक गाळे आहेत. तसेच रिध्दी सिध्दी कन्स्टक्शन मध्येही त्यांची गुंतवणूक आहे. महावीर अमृत सोसायटी सानपाडा येथेही त्यांचा फ्लॅट आहे. पांडुर्ली तसेच इगतपुरी येथे शेतजमीन आहे, असा आरोप करत अजित पवार यांनी त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube