Letsupp poll : एकनाथ शिंदेंकडून फडणवीसांचा पाठलाग, दोघांत फक्त 4 टक्क्यांचा फरक

Letsupp poll : एकनाथ शिंदेंकडून फडणवीसांचा पाठलाग, दोघांत फक्त 4 टक्क्यांचा फरक

BJP-ShivSena Controversy : वर्तमानपत्रात छापून आलेल्या जाहिरातीने भाजप-शिवसेना यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. या जाहिरातीमध्ये ‘राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात छापून आली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना अधिक लोकांची पसंती दाखवण्यात आली होती. याच कारणाने भाजप नेत्यांना आणि देवेंद्र फडणवीस यांना ही जाहिरात जास्त झोंबली होती. यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते. यानंतर शिंदे गटाने आणि एकनाथ शिंदे यांनी हा वाद मिटवण्याचा देखील प्रयत्न केला होता. पण लेट्सअप मराठीने केलेल्या एका सर्वेक्षणात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का देणारी माहिती समोर आली आहे. दोघांच्या टक्केवारीत फक्त 4 टक्क्यांचा फरक आहे.

भाजप-शिवसेना यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने ‘एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांपैकी मुख्यमंत्री म्हणून तुमची पसंती कोणाला असेल? असा सवाल लेट्सअप पोल मध्ये प्रेक्षकांना विचारला होता. यामध्ये गेल्या चोवीस तासात 31 हजार लोकांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये 52 टक्के लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना पंसती दिली आहे तर 48 टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आपले मत नोंदवले आहे.

‘कोणीतरी डोळे वटारले, अन् दुसरी जाहिरात छापली’; जयंत पाटलांनी शिंदे गटाला डिवचलं

एका युजरने म्हटले की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी फक्त देवेंद्र फडणवीसच पात्र आहेत. दुसरे कोणी नाही. महाराष्ट्राने आतापर्यंत पाहिलेले ते सर्वात यशस्वी मुख्यमंत्री आहेत. एक तरुण, भ्रष्ट नसलेला, सुसंस्कृत, सुसंस्कृत, राज्याच्या कारभारावर परिपूर्ण आणि अद्भूत अधिकार असलेला, निष्कलंक चारित्र्य असलेला, विधानसभेतील जाणकार, पारंगत नेता. हे सर्व गुण त्याच्यात एकत्रित आहेत, असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने देवेंद्र फडणवीस सारख्या दमदार नेतृत्वाला एकनाथ शिंदे यांच्यासारख्या कमजोर नेतृत्वाखाली काम करावे लागणे चुकीचे आहे.

फडणवीस नक्की समजून घेतील; शंभुराज देसाईंना पूर्ण विश्वास

ह्या दोघांमुळे महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवले गेले आहेत. हे दोघेपण गुजरात पुढे झुकणारे आहेत आणि महाराष्ट्राला झुकणारा चालत नाही. महाराष्ट्रात फक्त मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे, असे एका युजरने म्हटले आहे. आणखी एका युजरने म्हटले आहे की हे दोघेही परत कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यांचा पक्ष कधीच बहुमतात निवडून येणार नाही. महाराष्ट्रीयन जनता फक्त उद्धव ठाकरे यांनाच बहुमतात निवडून देईल, असे म्हटले आहे.

‘नुसत्या नकला काढून मुख्यमंत्री होता येणार नाही’; आव्हाडांनी राज ठाकरेंना डिवचलं!

एका युजरने म्हटले आहे की दोघांनी ज्या पद्धतीने सत्ता स्थापन केली तो मार्ग लोकशाही पायदळी तुडवून, त्यामुळे लोकप्रिय हा शब्द यांना लागू होत नाही, भविष्यात यांचा उल्लेख काही वेगळाच केला जाईल, असे म्हटले आहे. यावर दुसऱ्या एकाने म्हटले की कोणीपण मुख्यमंत्री व्हा, फक्त बंद खोलीत कोणता शब्द देऊ नका, लोकांना आधीच सांगा जे काय ठरलं ते. तर आणखी एकाने म्हटले की या दोघांनीही महाराष्ट्राबाहेर गेलेले उद्योगधंदे परत महाराष्ट्रत घेऊन यावे, मग आम्ही ठरवू.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube