कॅबिनेट दर्जा मिळूनही बच्चू कडू नाराजचं; थेट मंत्रालयातून करणार शिंदे-फडणवीसांची कोंडी

कॅबिनेट दर्जा मिळूनही बच्चू कडू नाराजचं; थेट मंत्रालयातून करणार शिंदे-फडणवीसांची कोंडी

Bachchu Kadu :राज्यातील सत्ताबदलावेळी आमदार बच्चू कडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. मात्र, तरीही त्यांना मंत्रिपद देण्यात आलं नव्हतं. त्यामुळं कडू यांनी वारंवार शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमदार कडू यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला. मात्र, तरीही बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात  आक्रमक पवित्रा घेतला आहे. चांदूरबाजार तालुक्यातील आसेगाव व तळेगाव मोहना येथील १४ हजार शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे (heavy rain) नुकसान झाले आहे. त्यांच्या २४ कोटी रूपये मदतीसाठी अनेकवेळा घोषणा होऊनही रक्कम उपलब्ध झाली नाही. त्यामुळे आ. बच्चू कडू (Bachchu Kadu) आपल्याच शासनाविरोधात संतप्त झाले आहेत. आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचा समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आ. बच्चू कडू यांनी १५ जूनपासून मंत्रालयात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. (For 14,000 farmers, Bachchu Kadu are on hunger strike from tomorrow in the ministry against the government)

आ.बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देतांना सांगितले की, याबाबत गेल्या ५ जनला मंत्रालयात अल्टीमेटम देण्यात आला होता. गेल्या खरीप हंगामातील जुलै-ऑगष्ट महिन्यात चांदूरबाजार तालुक्यात अतिवृष्टी झाली. त्यात आसेगाव व तळेगाव मोहना या दोन मंडळांना या परिसरातील पर्जन्यमान यंत्राच्या तांत्रिक अडचणीमुळे अतिवृष्टीची नोंद झाली नसल्याने वगळण्यात आले. सदर चूक लक्षात आणून दिल्यानंतर या दोन मंडळातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामे करुन प्रशासनाकडन शासनाला मदतीची मागणी करण्यात आली. अर्थसंकल्पात ७६ कोटीची मदत घोषित करण्यात आली. यात या दोन मंडळातील १४ हजार शेतकन्यांच्या २४ कोटी निधीचा समावेश आहे.

चांदुरात भजन अन् मंत्रालयात उषोषण
चांदूरबाजार तालुक्यातील आसेगाव व तळेगाव मंडळातील अतिवृष्टीच्या मदत निधीचा मुद्दा गेल्या वर्षभरापासून चांदूरबाजारपासून मुंबईपर्यंत गाजत आहे. चूक पर्जन्यमापक यंत्राची असतांना त्याचा फटका या दोन मंडळातील १४ हजार शेतकऱ्यांना बसला. यात शेतकऱ्यांच्या हाती येणारे कपाशी, सोयाबीन, तूर पिकांचे ३३ टक्क्याचे वर नुकसान झाले. २४ कोटीचा निधी अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नसल्याने आ. बच्चू कडू यांनी १५ जून पासून मंत्रालयात उपोषण करणार आहे, तर १५ जूनलाच मदत निधी त्वरित देण्याची सद्बुध्दी शासनाला लाभो, यासाठी लोकविकास संघटनेचे गोपाल भालेराव व रमण लंगोटे भजन करणार आहे.

यासाठी आ.बच्चू कडूंनी मदत व पुनर्वसन सचिवांशी संपर्क साधून सदरचा मदत निधी तत्काळ देण्याचे निर्देश दिले. तर या परिसरातील शेतकऱ्यांनीही उपोषण केले. भाजप, लोकविकास संघटना, तालुका प्रहार जनशक्ती पक्ष यांनी सुध्दा जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयावर धडक देऊन रखडलेली अतिवृष्टीची मदत देण्याची मागणी केली. तरी सुध्दा शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मदत पोहोचली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीसाठी मोठी अडचण जात आहे. परिणामी संतप्त झालेले आ. बच्चू कडूंनी १५ जूनपासून मदत व पुनर्वसन मंत्रालयाचे सचिव यांच्या दालनात आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला. आ. बच्चू कडू यांनी असेही सांगितले की, बजेट सत्राच्या अधिवेशनात शासनाने सदर दोन्ही सर्कलसाठी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन दिले होते. वारंवार विनंती करूनही प्रत्यक्ष मदत मिळाली नाही. सरकार आमचेच आहे. परंत शेतकऱ्याच्या हितासाठी नाइलाजास्तव आमरण उपोषणाचा मार्ग पत्कारावा लागत आहे.

दरम्यान, सरकार समर्थित आमदारांनी सरकार विरोधात उपोषण करण्याचा निर्धार जाहीर केल्याने शिंदे-फडणवीस सरकार आता तरी मदतीपासून वंचित शेतकऱ्यांना मदत देणार काय ? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube