Bharat Gogavale : ‘बेडूक फुगतो की सुजतो हे ‘तेव्हा’ कळेल; बोंडेंच्या टीकेच्या टीकेला गोगावलेंचं प्रत्युत्तर

Bharat Gogavale : ‘बेडूक फुगतो की सुजतो हे ‘तेव्हा’ कळेल;  बोंडेंच्या टीकेच्या टीकेला गोगावलेंचं प्रत्युत्तर

Bharat Gogavale : काल शिवसेनेने देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात सर्वच वृत्तपत्रांतून प्रसिध्द करण्यात आली. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय नेते आहेत असा दावा करण्यात आला. या जाहिरातीवरून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करत आहेत. भाजप खासदार अनिल बोंडे यांनीही बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही, अशी बोचरी टीका मुख्य़मंत्री शिंदेंवर केली होती. त्याला आता शिवसेनेचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. ( (Bharat Gogavale React on BJP MP Anil Bonde)

अनिल बोंडे यांनी केलेल्या टीकेबाबत भरत गोगावले यांना विचारले असता ते म्हणाले की, मी आताच उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी त्या लोकांना तिथूनच फोन करून काय सांगायचं ते सांगितलं आहे. त्यामुळं आता आम्ही त्या खोलात जास्त शिरत नाही. वरच्या स्तरावर काय तो विचार केला जाईल. तेव्हा कळेल, बेडूक फुगतो की सुजतो, असं गोगावले म्हणाले.

ज्यांच्यामुळे भाजप आणि शिंदेंचे भिनसले, ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याची प्रॉपर्टीच अजितदादांनी वाचली 

गेल्या काही दिवसापासून भाजप आणि शिवसेना यांच्यात अंतर्गत धुसपूस पाहायला मिळत आहे. दोन दिवसाआधी कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यातल्या कुरबुरी वाढल्या होत्या. कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते म्हणतील तोच उमेदवार मान्य केला जाईल, असा ठरवा भाजपने घेतला होता. त्यानंतर काल एक जाहिरात प्रकाशित झाली. त्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी वर्चस्व दाखवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना स्थानच दिले नाही. त्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा विषय राज्याच्या राजकारणात चर्चेता ठरत आहे.

अनिल बोंडे यांनी याच जाहिरातीवरून टीका केली. एकनाथ शिंदें त्यांचे सल्लागार चुकीचे सल्ले देत आहेत. एकनाथ शिंदेंना ठाणे म्हणजे महाराष्ट्र वाटत आहे. मात्र ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नाही. बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होत नाही, अशी परखड टीका केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube