Download App

Ahmednagar Rain : नगर शहराला पावसाचा तडाखा! अनेक ठिकाणी अतिवृष्टी; जिल्ह्यातही कोसळ’धार’

Ahmednagar Rain : नगर शहर आणि जिल्ह्यात शनिवारी सायंकाळनंतर तुफान पाऊस (Rain) झाला. या पावसाने शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अक्षरशः धुमाकूळ घातला. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. लोकांच्या घरात आणि दुकानांत पाणी शिरले. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. नागरिकांना रात्र जागून काढावी लागली, अशी परिस्थिती होती. नगर शहरातील नालेगाव 166 मिमी, केडगाव, 128 मिमी, भिंगार 98 मिमी या चार महसूली मंडळात अतिवृष्टी (Ahmednagar Rain) झाली. या व्यतिरिक्त जिल्ह्यात अनेक मंडाळात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली.

पुढील दोन दिवस जिल्ह्यात विजेच्या कडकटांसह वादळी वाऱ्याच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जिल्हा प्रशासनाने दक्षता घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. अहमदनगर शहर व जिल्हामध्ये गेले दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारली होती.परंतु तीन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास जोरदार असे पावसाचे आगमन होत आहे. शनिवारी चार वाजल्यापासून जोरदार असा पाऊस सुरू झाला.

Ahmednagar Rain : नगरमध्ये धुव्वाधार पाऊस, शहरातील रस्त्यांवर ‘महापूर’

नगर शहरात तब्बल चार तास मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यानंतर मात्र पावसाचा जोर कमी झाला. मात्र त्याहीपुढे बराच वेळ संततधार पाऊस सुरू होता. या पावसाने शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. लोकांच्या घरात पाणी शिरल्यान त्यांचे मोठे नुकसान झाले. दुकानांतही पाणी शिरले. त्यामुळे दुकानातील सामान सुरक्षित ठिकाणी नेताना दुकानदारांची मोठी कसरत झाली.

शहरातील रस्ते प्रचंड खराब झाले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांत पाणी साचले. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. खड्ड्यात आदळून वाहने चालवताना वाहनचालकांची चांगलीच धांदल उडाली होती. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना रस्त्यांच्या दुर्दशेने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

जिल्ह्यात धुवाधार, अनेक गावांत अतिवृष्टी

नगर शहरासह जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. नगर तालुक्यातील जेऊर (102 मिमी), चिचोंडी (89.8), वाळकी (96.3), चास (162.3) आणि रुईछत्तीसी महसूल मंडळात 119.8 मिमी इतका जोरदार पाऊस झाला. पारनेर तालुक्यातील भाळवणी (97.8), सुपा (66.3), पळशी मंडळात 99.5 मिमी पाऊस झाला. श्रीगोंदा तालु्क्यातील काष्टी (90.3), जामखेड तालुक्यात नान्नज 73.3, शेवगाव मंडळात 77.8 इतका जोरदार पाऊस झाला.

Nagpur : दोन तासांचा पाऊस दोन महिलांच्या जीवावर बेतला; 400 जणांची सुटका; जनावरांचीही जिवीत हानी

Tags

follow us