Sujay Vikhe : आत्मनिर्भर भारतासाठी शाळा या देखील ऊर्जाक्षेत्रात आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत. दिवसेंदिवस शिक्षण प्रणालीमध्ये बदल होत आहेत. अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून आमूलाग्र बदल घडवत शैक्षणिक दर्जा वाढविण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता ग्रामीण भागामध्ये जितक्या अनुदानित शाळा आहेत अशा शाळांना सोलर पॅनल बसवणार असल्याचा निर्धार खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी व्यक्त केला.
नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय करंजी येथे विविध खेळांचे मैदानी व इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त वर्गांचे उद्घाटन खासदार डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी ते बोलत होते. देशात विजेची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागणीनुसार अजूनही अनेक ठिकाणी वीज पुरवठा पाहिजे त्याप्रमाणात होत नाही. ग्रामीण भागात तर सातत्याने लोडशेडिंगचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत सोलर पॅनल ग्रामीण भागातील शाळांसाठी वरदान ठरणार आहे.
Sujay Vikhe : ‘कुणाच्या नाड्या कशा आवळायच्या मला ठाऊक’ साखरपेरणीनंतर विखेंचाही ‘कडू’ डोस
यावेळी त्यांनी उद्घाटन झाल्यानंतर शाळेत विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसून शिक्षकांचे अध्यापन ऐकले. विशेष म्हणजे बसविण्यात आलेल्या या इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांसाठी शिकणे अधिक सोपे झाले असून या बोर्डच्या मदतीने शिक्षक गुगल तसेच युट्यूबसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. हवी ती माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले असे मत त्यांनी व्यक्त केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून विद्यार्थी अधिक सक्षम कसा बनेल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे मत खासदार सुजय विखेंनी व्यक्त केले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मागील वर्षात 100 व यावर्षी 200 डिजिटल बोर्ड आपण जिल्हा परिषद शाळांना दिली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
Sujay Vikhe : लोकसभेला विरोधात उमेदवार कोण? सुजय विखेंनी दिले सडेतोड उत्तर