Download App

“कांदा निर्यातबंदी उठलीच नाही, फ्लेक्स लावून नुसतीच बनवाबनवी”; थोरातांचा विखेंना खोचक टोला

Image Credit: Letsupp

Balasaheb Thorat : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवल्याच्या (Onion Export Ban) बातम्या आल्या. या निर्णयाकडे सरकारचा मास्टरस्ट्रोक म्हणून पाहिले जाऊ लागले. खासदार सुजय विखे यांनीही या निर्णयाचे क्रेडिट घेत जल्लोष केला. परंतु, त्यांचा हा आनंद औटघटकेचाच ठरला. कारण, निर्यातबंदी उठवली नसल्याचे सरकारकडूनच स्पष्ट करण्यात आले. यानंतर विरोधकांनी भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. विखेंचे कट्टर राजकीय विरोधक माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही संधी साधून घेत मंत्री राधाकृष्ण विखे आणि भाजप खासदार सुजय विखेंवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

कांदा निर्यातबंदी केली कशासाठी, कांद्याचे भाव वाढले त्यावेळी निर्यातबंदी करून कांद्याचे भाव कोसळले. शेतकऱ्यांच्या लाभाऐवजी त्यांना कवडीमोल भावात कांदा विकावा लागला. यांच्यातील श्रेयवाद फार मोठा आहे. कांदा निर्यात बंदीबाबत मोठमोठे फ्लेक्स बॅनर लावले गेले प्रत्यक्षात मात्र निर्यात बंदी उठलीच नाही त्यामुळे सध्या असा हा बनवाबनवीचा कार्यक्रम चाललेला आहे, अशा शब्दांत त्यांनी विखेंना खोचक टोला लगावला.

दुपारपर्यंत ‘रास्तारोको’, नंतर ‘धरणे’ द्या, उद्या आंतरवालीत बैठक; जरांगेंचं समाजबांधवांना आवाहन

थोरात यांनी नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. ते पुढे म्हणाले, ज्या पद्धतीने इतर पक्षातून आलेल्यांना संधी दिली जाते त्यानुसार भाजपातील लोकांनाच आरक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यसभेवर सहापैकी चारजण आमच्याच विचारांचे पाठवल्याने भाजपातील मूळ कार्यकर्त्यांना आरक्षण मागण्याची वेळ आली आहे.

सध्याचे सरकार हे गुजरातचे नेते जे केंद्रामध्ये आहेत त्यांच्या हुकुमावर चालते आहे. त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करते. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रापेक्षा गुजरात महत्त्वाचा वाटतो. आज महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातकडे जात आहेत आता महानंद प्रकल्प गुजरातमध्ये जात आहे. दिल्लीत ठरले जाते महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी हे करताना दिसत आहेत अशी टीका थोरात यांनी केली.

Rohit Pawar : ‘तिकीट’ संकटात म्हणून दिल्ली दौरे वाढले का? रोहित पवारांचा विखेंना खोचक सवाल

निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस असं चिन्ह दिलं आहे याबाबत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारले असता त्यांनी ‘तुतारी’चा आवाज जोरदार येणार यात शंका नाही. आजच शेवटच्या घटकापर्यंत तुतारी पोहोचलेली आहे. शरद पवार यांचे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठीचे योगदान जनता विसरणार नाही. तत्व आणि विचारांशी बांधिलकी त्यांनी ठेवलेली आहे, असे थोरात म्हणाले.

नगर दक्षिण मतदार संघाचे वातावरण भाजपासाठी अनुकूल नसून महाविकास आघाडीसाठी अनुकूल असल्याचे दिसते. मंत्री विखेंनी त्यांच्या खात्याचा बारकाईने अभ्यास करणे गरजेचे आहे. 22 कोटींचा महसूल वाळू आणि गौण खनिजामधून मिळत होता. आता त्यांना व्यक्तिगत टीका करण्याचे कारण नव्हते. विचारांचा विरोध विचारांनी करणं महत्त्वाचं असतं परंतु मध्यंतरी मी भाषण केले होते ते त्यांच्या जिव्हारी लागले आहे.

follow us

वेब स्टोरीज