Ahilyanagar News : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मतदान सुरू आहे. अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर राडा झाल्याच्या बातम्या येत आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघातही यंदा अटीतटीची लढत आहे. विद्यमान आमदार रोहित पवार यांच्या विरोधात विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे मैदानात आहेत. काल रोहित पवार यांच्या कारखान्याच्या संबंधित व्यक्तीला पैशांसह पकडण्यात आले होते. या प्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे. तसेच भाजप नेत्यांनी रोहित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर आता भाजप उमेदवार राम शिंदे यांच्यासाठी कर्जत शहरातील एका हॉटेलमध्ये पैसे वाटप केले जात असल्याचा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनीच ट्विट करत हा दावा केला आहे.
मोठी बातमी ! रोहित पवारांच्या कारखान्याचा एमडीच पैशांसह पकडला; किती पैसे वाटले ?
या प्रकाराची माहिती देताना रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, की भाजप उमेदवार राम शिंदे यांच्यासाठी कर्जतच्या हॉटेलमधून पैसे वाटप केले जात असल्याची माहिती आमच्याकडून दुपारी दोन वाजता प्रशासनाला देऊनही प्रशासनानं त्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. तब्बल दोन तासांनंतर चार वाजता संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्याठिकाणी पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप करताना आमच्या कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला रंगेहाथ पकडलं.
भाजप उमेदवार राम शिंदे यांच्यासाठी कर्जतच्या लकी हॉटेलमधून पैसे वाटप केले जात असल्याची माहिती आमच्याकडून दुपारी २ वाजता प्रशासनाला देऊनही प्रशासनाने त्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि तब्बल दोन तासांनी ४ वाजता संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्याठिकाणी पोलिस बंदोबस्तात पैसे वाटप… pic.twitter.com/3qtKI03e2h
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 20, 2024
पैसे वाटप करणारी व्यक्ती ही मंगळवेढा येथील असून राम शिंदे यांचा नातेवाईक असल्याचं सांगत आहे. त्याच्याकडं पाच ते आठ लाख रुपये रोख रकमेसह लाखो रुपयांच्या याद्याही सापडल्या असून हा सर्व ऐवज पोलिसांकडे दिला आहे. याबाबत प्रशासन काय कारवाई करतं याकडं आमचं बारकाईने लक्ष आहे. यावरुन राम शिंदे यांचा अवतार म्हणजे मी नाही त्यातला अन् पैसा ओतला बदाबदा.. असाच म्हणावा लागेल.
भाजप उमेदवार राम शिंदे यांच्यासाठी कर्जतच्या लकी हॉटेलमधून पैसे वाटप केले जात असल्याची माहिती आमच्याकडून दुपारी २ वाजता प्रशासनाला देऊनही प्रशासनाने त्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि तब्बल दोन तासांनी ४ वाजता संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्याठिकाणी पोलिस बंदोबस्तात पैसे वाटप… pic.twitter.com/3qtKI03e2h
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 20, 2024
दरम्यान, याआधी काल रोहित पवार यांच्या कारखान्याशी संबंधित व्यक्तीला काल पकडण्यात आलं होतं. राम शिंदेंच्या समर्थकानेच या व्यक्तीला पकडलं होतं. बारामती अॅग्रो युनिट क्रमांक तीन या साखर कारखान्याचे एमडी मोहीते या व्यक्तीला पकडण्यात आलं होतं. नान्नज येथे मतदारांना पैसे वाटताना ग्रामस्थ व सरपंचांनी त्यांना पकडलं होतं. मोहीते यांना गावकऱ्यांनी पकडले असता गावकऱ्यांनी त्यांची झाडाझडती घेतली.
त्यांच्याकडे एक लाख रुपये रोख रक्कम सापडली. त्यांच्यासोबत एक हस्तलिखित चिठ्ठी मिळाली होती. त्यामध्ये वेगवेगळ्या गावात ६० लाख रुपये वाटल्याचे नावासहीत हिशोब लिहिलेला होता. त्या चिठ्ठीत रोहित पवार यांचा समर्थक असलेला स्थानिक एका नेत्याचेही नाव होते. त्यावर त्या नेत्याचे पतसंस्थेचा उल्लेख होता.