मोठी बातमी ! रोहित पवारांच्या कारखान्याचा एमडीच पैशांसह पकडला; किती पैसे वाटले ?

  • Written By: Published:
मोठी बातमी !  रोहित पवारांच्या कारखान्याचा एमडीच पैशांसह पकडला; किती पैसे वाटले ?

Maharashtra assembly elections 2024 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे पकडण्याच्या राज्यात अनेक घटना घडल्या आहेत. विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप होत आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघात (Karjat-Jamkhed Assembly) राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) उमेदवार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या कारखान्याच्या संबंधित व्यक्तीला पैशांसह पकडण्यात आले आहे. भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या समर्थकाने या व्यक्तीला पकडले आहे. याप्रकरणी पोलिस चौकशी सुरू आहे.

जीवे मारण्याच्या धमकीनंतर राम शिंदेंचे रोहित पवारांकडे बोट, ‘असे राजकारण कर्जत-जामखेडमध्ये…’

बारामती अॅग्रो युनिट क्रमांक तीन या साखर कारखान्याचे एमडी मोहीते या व्यक्तीला पकडण्यात आले आहे. नान्नज येथे मतदारांना पैसे वाटताना ग्रामस्थ व सरपंचांनी त्यांना पकडले आहे. मोहीते यांना गावकऱ्यांनी पकडले असता गावकऱ्यांनी त्यांची झाडाझडती घेतली. त्यांच्याकडे एक लाख रुपये रोख रक्कम सापडली. सोबतचं त्यांच्यासोबत एक हस्तलिखित चिठ्ठी मिळाली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या गावात ६० लाख रुपये वाटल्याचे नावासहीत हिशोब लिहिलेला आहे. त्या चिठ्ठीत रोहित पवार यांचा समर्थक असलेला स्थानिक एका नेतेचेही नाव आहे. त्यावर त्या नेत्याचे पतसंस्थेचा उल्लेख आहे.

ग्रामस्थांनी त्यांची चौकशी करताना तुम्ही गावात का व कशासाठी आलात विचारले असता त्यांनी कारखान्याचे कामगार असल्याचं सुरवातीला सांगितलं पण ग्रामस्थांची गर्दी जमताच त्यांनी सुभाष गुळवे यांच्या सुचनेप्रमाणे आम्ही पैसै पोहोच करण्याचं काम करत असल्याची कबुली दिली!. मोहिते यांना पकडल्यानंतर नान्नजचे सरपंच यांनी फोन लावून पोलीसांना कळवून मोहिते व त्यांची बोलेरो गाडी व त्यांचा ड्रायव्हर यांना पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube