कर्जत-जामखेडकरांच्या मनात काय? राम शिंदेंनी एकाच वाक्यात सांगून टाकलं
Ram Shinde criticized Rohit Pawar : कर्जत जामखेड एमआयडीसी प्रश्नावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील दोन आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. हळगावच्या कारखान्यावरून भाजप आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. कर्जत जामखेडच्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला निवडून दिले मात्र तुम्हीच त्यांच्यावर अविश्वास दाखविला असा आरोप शिंदे यांनी केला.
गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यातील कर्जत – जामखेडच्या एमआयडीसीच्या मुद्द्यावरून राम शिंदे व रोहित पवार हे अनेकदा आमने सामने आले आहे. या मुद्द्यावरून दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप देखील झाले. यातच आमदार राम शिंदे यांनी हळगावच्या कारखान्यावरून रोहित पवारांवर टीका केली आहे.
सत्य समोर आल्याने पळापळ पण, वेळ निघून गेली
कारखाना घेतला तर सगळी माणसं काढून टाकली. सीएसआरमध्ये जे काही त्यांनी काम केले त्यासाठी पोकलेन कुठून आणायचे, डिझेल कुठून आणायचे हे सगळं आता लोकांना माहित पडलं आहे. आपण त्यांना विनाकारणच निवडून दिलं ही लोकांची भावना झाली आहे. हे सत्य बाहेर आल्याने पळापळ सुरू आहे. परंतु आता मात्र वेळ निघून गेली आहे, असा टोला शिंदे यांनी लगावला.
काय भाषणं करायचे? पण मंत्रीपद अन् ‘हरहर मोदी’…; संदीप क्षीरसागरांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
हळगावचा कारखाना त्यांनी विकत घेतला आणि तेथे जे स्थानिक लोक काम करत होते त्या सगळ्यांना कामावरून काढून टाकले. आता ते सगळे त्यांच्या नावाने बोंबा मारत आहेत. 2019 मध्ये रोहित पवार यांना मतदारांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं. आजतागायत कर्जत जामखेडमधला एकही पीए त्यांनी ठेवला नाही. हे कटू सत्य आहे मान्य केलच पाहिजे. कर्जत जामखेडने त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी मात्र कर्जत जामखेडवर विश्वास ठेवला नाही हे गेल्या चार वर्षात दिसून आले आहे. आता एक वर्षावर निवडणुका आल्यात. आमचा साधा एक पीए ठेवला नाही आम्ही कसा तुमच्यावर विश्वास ठेऊ? असा सवाल कर्जत जामखेडची जनता आता विचारत आहे.