Harshada Kakade : ‘साखरसम्राटांना त्यांच्या पैकीच एक जण वर पाठवायचा असतो. त्यांना आपल्यासारखी साधी माणसं चालत नाहीत. वावड्या उठवून आपल्या राजकारणाची पोळी या लोकांनी आतापर्यंत भाजून घेतली. पण आता या वावड्या उठवणाऱ्या राजकारण्यांची पोळी भाजणार नाही. सर्वसामान्य जनतेची पोळी भाजणार. गजाननाच्या पायांवर हात ठेऊन सांगते, की आजपर्यंत मी आणि काकडे साहेब कुणाच्याही रुपयाला लाजिणदार नाही आणि कुणाला पाठिंबाही दिलेला नाही’, अशा शब्दांत शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदरारसंघातील उमेदवार हर्षदा काकडे (Harshada Kakade) म्हणाल्या.
माझे तिकीट कापले, आता त्याची परतफेड करण्याची वेळ ; हर्षदा काकडे यांचा मोनिका राजळेंवर हल्लाबोल
येथील प्रचारसभेत हर्षदा काकडे यांनी तालुक्यातील प्रस्थापित साखरसम्राटांवर जोरदार हल्ला चढवला. या सभेस नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. काकडे पुढे म्हणाल्या, ‘मी सात आठ दिवसांपूर्वी भावी निमगावला गेले होते. त्याठिकाणी एक जण मला हेच म्हणाला. मी म्हटलं कोण तुला आम्ही पैसे घेऊन माघार घेतली म्हणतो. त्याला समोर बोलाव. देवीच्या चरणांवर हात ठेऊन सांग कुणी पैसे दिले? किती दिले? कुठं दिले? गजाननाच्या पायांवर हात ठेऊन सांगते, की आजपर्यंत मी आणि काकडे साहेब कुणाच्याही रुपयाला लाजिणदार झालेलो नाही आणि कुणाला पाठिंबा सुद्धा दिलेला नाही.’
‘आता अशा पद्धतीने वावड्या उठवणाऱ्या राजकारण्यांची पोळी भाजणार नाही तर सर्वसामान्य जनतेची पोळी भाजणार आहे. सर्वसामान्य जनतेचं नेतृ्त्व करणाऱ्या आपल्या सगळ्यांची पोळी आता भाजणार आहे’, असा विश्वास हर्षदा काकडे यांनी यावेळी व्यक्त केला. ‘ज्यावेळी तुम्ही जिल्हा परिषद निवडणुकीत उभ्या राहता तेव्हा फक्त एकट्याच निवडून येता असे काही जण म्हणतात. मला त्यांना सांगायचंय तुम्हाला देवानं तोंड दिलंय तशी बुद्धी पण दिली असेल ना? असा सवाल हर्षदा काकडे यांनी या सभेतून उपस्थित केला.
ढाकणेंच्या एन्ट्रीने उमेदवारीचा पत्ता कसा कट झाला ? हर्षदा काकडेंनी सांगितली बंडखोरीमागची स्टोरी
दरम्यान, हर्षदा काकडेंच्या या वक्तव्यामागे 2009 मधील विधानसभा निवडणुकीचा संदर्भ आहे. यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी हर्षदा काकडे यांनी पैसे घेऊन माघार घेतल्याचे प्रचारीत केले होते. त्याचा संदर्भ घेत हर्षदा काकडे यांनी सभेतून जोरदार हल्लाबोल केला.