Maharashtra Elections : राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. सगळीकडेच (Maharashtra Elections) निवडणुकीचं वातावरण दिसत आहे. वरिष्ठ पातळीवर मतदारसंघ उमेदवारांची चाचपणी आणि जागावाटपासाठी (Elections 2024) वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. तर मतदारसंघात बॅनर वॉर सुरू झालं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर टीका करणारे फलक जागोजागी दिसत आहेत. नेतेमंडळी अन् इच्छुक उमेदवारांचा उदोउदो करणारेही बॅनर आहेत. पण, नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या (Rohit Pawar) मतदारसंघात वेगळंच बॅनर लागलं आहे.
या बॅनरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कारण या बॅनरमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची निवडणूक चिन्ह एकत्रित दाखवण्यात आली आहेत. आता ज्या पक्षाविरोधात निवडणूक लढवायची. निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर टीका करायची त्याच पक्षाचा बॅनर जर आपल्यासोबत असेल तर नेते, पदाधिकारी, उमेदवार अन् कार्यकर्ते सगळ्यांचीच गोची होणार. अशीच पंचाईत कर्जत जामखेडमध्ये झाली आहे.
बारामतीत मत खरेदीसाठी दिडशे कोटींचा वापर; Rohit Pawar यांचा अजितदादांवर गंभीर आरोप
या मतदारसंघात (Karjat Jamkhed Condtituency) हम पांच पॅटर्नचे बॅनर लागले आहेत. या बॅनरवर हम साथ, साथ हैं! असे लिहून त्याखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण, राष्ट्रवादी अजित पवार गटाचं घड्याळ आणि भाजपाचे निवडणूक चिन्ह कमळाचे फोटो आहेत. या फोटोंखाली हम भी साथ हैं! असे लिहित त्याखाली शिवसेना उबाठाचे मशाल आणि काँग्रेसचे निवडणूक चिन्ह पंजाचे फोटो आहेत. त्याखाली इसिलिए कर्जत-जामखेड में 2020 में हम पांच-पांच हैं! असे शब्द लिहिले आहेत. या बॅनरची मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
या बॅनरमध्ये एक गोष्ट अगदी स्पष्टपणे दिसत आहे ती म्हणजे बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निवडणूक चिन्ह तुतारी दिसत नाही. विशेष म्हणजे या मतदारसंघात शरद पवार गटाचे रोहित पवार आमदार आहेत. तसेच महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि काँग्रेस देखील आहे. या दोन्ही पक्षांचे निवडणूक चिन्ह बॅनरवर आहे. मात्र तुतारी नाही. त्यामुळे अनेक शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. बॅनरची ही राजकीय गुगली नेमकी कुणी टाकली? महायुतीच्या विरोधात असताना ठाकरे गट आणि काँग्रेसचे चिन्ह बॅनरवर कसे? यामागचा उद्देश काय? आमदार रोहित पवार यांना धक्का देण्याचा प्लॅन नेमका कुणी आखलाय? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
Rohit Pawar On Ajit Pawar : हाच का तुमचा स्वाभिमान?, अजित पवारांवर रोहित पवारांचा घणाघात