Download App

माजी खासदार तनपुरेंनी धमकावलं; कर्डिले समर्थक बाचकरांची पोलिसांत धाव

माजी खा. प्रसाद तनपुरे यांनी धनगर समाजाचे नेते अण्णासाहेब बाचकर यांना फोनवरून धमकी दिल्याची क्लिप व्हायरल झाली आहे.

Rahuri News : राहुरी विधानसभा मतदारसंघात प्रचार (Rahuri News) शिगेला पोहोचला असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचे वडील माजी खा. प्रसाद तनपुरे यांनी धनगर समाजाचे नेते अण्णासाहेब बाचकर यांना फोनवरून धमकी दिल्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या प्रकरणाचा भाजपा पदाधिकाऱ्यांनी निषेध केला आहे. दरम्यान, या प्रकरणी अण्णासाहेब बाचकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे. तसेच जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार अर्जही दिला आहे.

बाचकर यांना धमकीची ऑडिओ क्लीप समाजमाध्यमांत व्हायरल झाली आहे.’तू तुझ्या पुढच्या भवितव्याचा विचार करून ठेव, इतकं सोपं नाही आता तनपुरेंच्या विरोधात जाणं. तुला सांगून ठेवतो, इथून पुढे कोणी काही केलं तर माफ करणार नाही, कोण काय करतो ते आता मी पाहतो. तुझी संघटना गेली खड्ड्यात, तुझ्या जवळचा कोण आहे? आता दादाचा प्रचार करायचा हे लक्षात ठेव नाही तर तू आणि तुझी पक्ष संघटना पाहून घेतो, अशा प्रकारे धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा दावा भाजप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

राहुरीत शिवाजीराव कर्डिलेंना दिला लहुजी शक्ती सेनेने जाहीर पाठिंबा, म्हणाले मोठ्या मताधिक्क्याने 

सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या तनपुरे यांनीच सामान्य कार्यकर्त्याला धमकवण्याचा प्रयत्न केल्याने कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. असे भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश बानकर व जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आज राहुरी तालुक्यामध्ये धनगर समाजाची बैठक झाली. त्यामध्ये तनपुरे कुटुंबियांचा निषेध व्यक्त करण्यात आला. अण्णासाहेब बाचकर यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ खेमनर यांनी केली.

बाचकर यांचे CM शिंदेंना पत्र

राहुरी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांचा प्रचार करत असताना माजी खा. प्रसाद तनपुरे व उमेदवार आ. प्राजक्त तनपुरे यांचे वडील यांनी मला फोनवर धमकी देत म्हणाले की तनपुरेंच्या विरोधात जाणे इतकं सोपं नाही, तुला समजून सांगतो तू प्राजक्तचे काम कर नाहीतर शांत बस अशी धमकी दिली असून माझ्या जीवाला तनपुरे यांच्याकडून धोका आहे तरी याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार करून संरक्षण मागणार आहे, अशी माहिती धनगर समाजाचे नेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अण्णासाहेब बाचकर यांनी दिली.

वांबोरी चारी टप्पा दोनच्या माध्यमातून सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार.. शिवाजीराव कर्डिले

follow us