Download App

मार मुसंडी! अहिल्यानगरच्या मातीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’, 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान होणार स्पर्धा

राज्यातील मानाची कुस्ती स्पर्धा अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार यंदा अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) रंगणार आहे

  • Written By: Last Updated:

Maharashtra Kesari Wrestling Tournament : राज्यातील मानाची कुस्ती स्पर्धा अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र केसर कुस्ती स्पर्धेचा (Maharashtra Kesari Wrestling Tournament) थरार यंदा अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) रंगणार आहे. राज्य कुस्तीगीर संघ आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने 67 वी वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब लढत दिनांक 29 जानेवारी ते 02 फेब्रुवारी 2025 अहिल्यानगरला होणार आहे. वाडियापार्क मैदान (Wadiapark ground) येथे ही स्पर्धा होणार आहे.

पुण्यातल्या गॅंगवॉरवरुन कधी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय का? हाकेंनी शरद पवारांनाच टार्गेट केलं 

सदर कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघास संलग्न असलेल्या 36 जिल्हे, 6 महानगरपालिका असे एकुण 42 संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेत एकूण 840 कुस्तीगीर सहभागी होत असून स्पर्धेदरम्यान 850 ते 900 कुस्त्या होतील. 100 पंच आणि 80 पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडणार आहे.

सदर स्पर्धेत महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, सिकंदर शेख, हर्षवर्धन सदगीर, बाला रफीक शेख, महेंद्र गायकवाड, पृथ्वीराज मोहोळ, वेताळ शेळके, माऊली कोकाटे, शुभम शिंदनाळ, सुदर्शन कोतकर, माऊली जमदाडे हे प्रमुख आकर्षण असणार आहे.

स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय राज्य मंत्री पै. मुरलीधर मोहोळ, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष-माजी खासदार रामदास तडस उपस्थित राहणार आहेत.

वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट; संदीप क्षीरसागर यांचा खळबळजनक दावा 

या कुस्ती स्पर्धेला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदिप (आप्पा) भोंडवे, सरचिटणीस हिंद केसरी पै. योगेश दोडके, अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आ. संग्राम जगताप, उपाध्यक्ष पै. अर्जुन (देवा) शेळके, महाराष्ट्र केसरी पै. अशोकभाऊ शिर्के, महाराष्ट्र केसरी पै. गुलाब बर्डे, सचिव प्रा. डॉ. पै. संतोष भुजबळ, सचिव पै. प्रविण घुले उपस्थित राहणार आहेत. तसेच सर्व पदाधिकारी, शहर तसेच जिल्हयातील सर्व पैलवान आणि वस्ताद मंडळी यांच्या उपस्थित ही स्पर्धा होत आहे.

follow us