Video : पुण्यातल्या गॅंगवॉरवरुन कधी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय का? हाकेंनी शरद पवारांनाच टार्गेट केलं

Video : पुण्यातल्या गॅंगवॉरवरुन कधी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय का? हाकेंनी शरद पवारांनाच टार्गेट केलं

laxman Hake News : पुण्यातल्या गॅंगवॉरवरुन शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना कधी पत्र लिहिलंय का? असा थेट सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाके (laxman Hake) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना केलायं. मस्सोजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case) आज बीडमध्ये ओबीसी समाजबांधवांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आयोजित सभेत बोलताना लक्ष्मण हाके यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधलायं.

दोन कोटींची डिफेंडर गाडी अन् पोलिसाच्या घरी दीड कोटी; आ. धसांचे आकावर गंभीर आरोप

लक्ष्मण हाके पुढे बोलताना म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरणी इथल्या न्यायव्यवस्थेवर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी बीडच्या आमदार खासदारांकडून केल्या जात आहेत. खुद्द शरद पवार यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. पुण्यातल्या कोयता गॅंगच्या माध्यमातून आज एका इंजिनिअर मुलीची हत्या झालीयं. पुण्यातल्या गॅंगवॉरवर मुळशी पॅटर्न नावाचा चित्रपट येतो. शरद पवारांनी पुण्यातील गॅंगवॉरवरुन कधीच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंयं का? असा थेट सवाल हाके यांनी शरद पवारांना केलायं.

तसेच शरद पवार यांना आत्तापर्यंत परभणी भीमसैनिकाच्या कुटुंबियांची भेट घेतली का? राजगुरुनगरमध्ये भेट दिली का? अंतरवली सराटी, बीडमध्ये शरद पवार येऊन गेल्यानंतर काय झालंय ते सर्व तुम्ही पाहिलं आहे. हेच शरद पवार कधीच इतर प्रकरणावर बोलत नाहीत. असाही हल्लाबोल लक्ष्मण हाके यांनी केलायं.

मुख्यमंत्री फडणवीस सध्या सहाव्या गिअरवर; बाकी मंत्री मात्र फक्त…काय म्हणाले आमदार रोहित पवार?

संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी प्रकरण या दोन्ही घटना महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणाऱ्या आहेत. गुन्हेगारांची जात शोधण्याचा बीडच्या नेत्यांकडून प्रयत्न होतोयं, याचा आम्ही ओबीसी बांधव निषेध करतोयं, गुन्ह्याचं आम्ही कधीही समर्थन केलेलं नाही, अशी वेळ कोणावरही येऊ नये असं म्हणणारी आम्ही माणसं आहोत, असंही ते म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना हाके यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचाही चांगलाच समाचार घेतलायं. अंजली दमानिया म्हणाल्या की, बीडमध्ये वंजारी जातीचेच अधिकारी आहेत. अहो मॅडम गोरगरीबांची पोरं कबाडाकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची पोरं स्पर्धा परिक्षा देतात. पोटाला चिमटा देऊन ते अधिकारी झालेत.

Video : बीअर, रम, जिन बकवास…; फडणवीसांसमोर गणेश नाईकांची तुफान बॅटिंग

तुम्ही त्या अधिकाऱ्याची जात काढता का? असं हाके म्हणाले आहेत. तसेच बीडमधील एक आदिवासी तरुण संजय गायकवाडच्या आरोपीचा शोध तुम्ही लावून द्या दमानिया मॅडम, कुठं गेला तो गायकवाड, गरीबांच्या पोराची हत्या झाल्यावर मोर्चे निघत नाही. खैरलांजी प्रकरण, नगरमध्ये मेहतर समाजाच्या पोराची हत्या, एका महिलेची नग्न धिंड काढून हत्या केली त्यावेळी आम्ही तुमच्या विरोधात जातीचा आधार घेऊन मोर्चे काढलेले नाहीत, असंही ते म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube