Download App

‘रोहित पवारांनी नकार दिला म्हणून लंकेंना गळ’; अजितदादांच्या शिलेदारानं सांगितलं शरद पवारांचं प्लॅनिंग

Image Credit: Letsupp

Lok Sabha Election 2024 : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सध्या (Lok Sabha Election 2024) चांगलीच गाजत आहे. अद्याप उमेदवार जाहीर झालेले नाहीत मात्र त्याआधीच राजकीय नाट्य रंगले आहे. या मतदारसंघात इच्छुक आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) शरद पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा काल दिवसभर सुरू होती. मात्र खुद्द शरद पवार (Sharad Pawar) आणि नीलेश लंके यांनी पत्रकार परिषदा घेत या चर्चा फेटाळून लावल्या. त्यानंतर आता अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी या घडामोडींवर खळबळजनक वक्तव्य केले आहे. निलेश लंकेंना नगर दक्षिण मतदारसंघातून लढण्याची आजिबात इच्छा नाही. पण, रोहित पवारांनी लढण्यास नकार दिला म्हणून जाणीवपूर्वक त्यांना महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढण्याचा आग्रह केला जात आहे, असा दावा शेळके यांनी केला.

Nilesh Lanke : काम शून्य पण श्रेय घ्यायला सगळ्यात पुढे; रस्त्याच्या कामावरून लंकेचा विखेंना टोला

शेळके पुढे म्हणाले, याआधी ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्यात लंके यांनी अजितदादांबरोबर राहण्याची भूमिका घेतली. ही भूमिका घेताना पुढं काय होईल त्याला सामोरे जाऊ याचीही तयारी त्यांनी ठेवली होती. परंतु, मागील दोन ते तीन महिन्यांपासून अनेकजण मागे लागले आहेत. निलेश लंके यांनी नगर दक्षिणमधून उमेदवारी करावी यासाठी त्यांना गळ घातली जात आहे.

या मतदारसंघात भाजपाचा खासदार आहे. त्यामुळे ही जागा त्यांनाच मिळेल यात काहीच शंका नाही. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर तेथे दुसरा पर्याय नव्हता. त्यात पुन्हा रोहित पवारांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यामुळे आमदार लंके यांना निवडणूक लढण्यासाठी महाविकास आघाडीकडून बळी दिला जात आहे. परंतु, मला विश्वास आहे की लंके कुठेच जाणार नाहीत, असे शेळके म्हणाले.

Ahmednagar Politics : आमदार नीलेश लंकेंकडून लोकसभा लढविण्याचे संकेत

follow us

वेब स्टोरीज