Ajit Pawar : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहाटेचा शपथविधी चांगलाच गाजला होता. त्याआधी एका उद्योजकाच्या घरी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली होती. त्या बैठकीला मी स्वतः शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी उपस्थित होते असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला होता. ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनी हा खुलासा केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. विरोधकांनी तर भाजपवर अक्षरशः टीकेची झोड उठवली होती. आपल्या वक्तव्याने चांगलाच गदारोळ उडाल्याचे लक्षात येताच अजित पवारांनी आता यू टर्न घेतला आहे. या बैठकीला गौतम अदानी उपस्थित नव्हते. त्यांनी कोणतीही मध्यस्थी केली नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
शिवसेना, राष्ट्रवादी फोडण्यामागे गौतम अदाणी? संजय राऊतांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अजित पवारांच्या या दाव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली होती. शरद पवार यांनी पक्ष फोडला की गौतम अदानी यांनी पक्ष फोडला हे अजित पवारांना विचारा. अजित पवार कबूल करत आहेत की, महाराष्ट्रातलं सरकार हे गौतम अदानीनं पाडलं आणि शिवसेना, राष्ट्रवादी फोडण्यामागे देखील नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांची हातमिळवणी आहे. अजित पवारांच्या म्हणण्यानुसार आमचं सरकार उद्योगपतींनी पाडलं. अदानी, फडणवीस आणि शहा यांच्यात वारंवार बैठका व्हायच्या, असं दावा संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत केला होता.
महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यामागे कोणाचा हात होता? राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडण्यामागे कोणाचा हात होता? हे गौतम अदाणी (Gautam Adani) आणि अजित पवार यांना विचारा, असेही शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले होते.
अजित पवार यांनी केलेल्या या दाव्याचे शरद पवार (Sharad Pawar) यांनीही खंडन केले होते. कामाच्या निमित्ताने माझी अनेक उद्योजकांशी भेट होत असते. पण उद्योजकांच्या मर्जीने असे कधी राजकारण चालत नसते असा टोला शरद पवारांनी लगावला होता.
मुलीनंतर थेट नातवालाच समोर केलं; मी पुतण्या असलो तरी मुलासारखाच, काय म्हणाले अजित पवार?