Jayant Patil : लोकसभेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. सभा आणि मेळाव्यांचा धडाका सुरू झाला आहे. महाराष्ट्रात तर अटीतटीची लढाई होणारच आहे. नेत्यांची वक्तव्ये तर तशीच येत आहेत. आताही शरद पवार गटाचे प्रवक्ते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी निफाड येथील सभेत केलेल्या वक्तव्याची तुफान चर्चा होत आहे. “मी एक कॉल करताच महायुती सरकारमध्ये मंत्री होऊ शकतो पण, शरद पवारांशी गद्दारी करणार नाही”, असे विधान जयंत पाटलांनी या सभेत केले.
Lok Sabha Election : महायुतीत धक्कातंत्र? 12 खासदारांना दणका, 8 भाजप उमेदवारांची यादी ‘रेडी’
या सभेत जयंत पाटील राज्यातील महायुती सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रात अस्थिर असणाऱ्या भाजपला पश्चिम महाराष्ट्रात संघटना मजबूत करायची आहे. त्यामुळे भाजप नेते आपल्याभोवती जाळे फेकत असतात. एका फोनवर माझ्यासाठी पहाटेचा शपथविधीचा कार्यक्रमही होऊ शकतो. परंतु, ज्यांनी आपलं राजकीय जीवन फुलवलं अशा शरद पवार यांच्यासाठी कोणताही त्याग करायला तयार आहोत, असे जयंत पाटील म्हणाले.