‘फडणवीस राजकारणात अॅक्टिव्ह झाले अन् मला’.. नाथाभाऊंनी सांगितला वाईट अनुभव

Eknath Khadse criticized Devendra Fadnavis : भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचा मेळावा काल मुंबईत झाला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच आम्ही शिवसेनेशी (शिंदे गट) भावनिक तर राष्ट्रवादीशी राजकीय युती केल्याचे म्हटले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार […]

eknath khadse devendra fadnavis (7)

eknath khadse devendra fadnavis

Eknath Khadse criticized Devendra Fadnavis : भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचा मेळावा काल मुंबईत झाला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच आम्ही शिवसेनेशी (शिंदे गट) भावनिक तर राष्ट्रवादीशी राजकीय युती केल्याचे म्हटले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा फडणवीस यांचे कट्टर विरोधक एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी अनेकांबरोबर भावनिक युती केली आहे. राजकारणात युती आवश्यक आहे, असे ते म्हणाले. म्हणजे सोयीनुसार राजकारण असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ आहे. त्यामुळे भविष्यात एमआयएमलाही भाजपसोबत घेऊ शकतील, अशी खोचक टीका खडसे यांनी केली.

ते पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस 2014 पासून राजकारणात अधिक सक्रीय झाल्यापासून राज्याच्या राजकारणात वाईट अनुभव आले आहेत. मलाच आले असे नाही तर अनेकांना आले आहेत. गेल्या 40 वर्षात असे घाणेरडे राजकारण पाहिले नव्हते, असे खडसे म्हणाले.

एका घरात 2 दोन चुली करायला, आम्हाला जबाबदार धरणार का? बडतर्फीनंतर खदखद बाहेर

तरीही दादांनी दोन मतं देऊन आमदार केलं, धनंजय मुंडेंनी सांगितलं ‘ते’ सिक्रेट

राजकारण हे राजकारण असते त्यात युती आवश्यक असते असे त्यांनी म्हटले. त्यामुळे भविष्यात ते कोणाशीही युती करणार असल्याचे दिसत आहे. ते आज एमआयएमशी युती करणार नसल्याचे म्हणत असले तरी काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्याबरोबर युती केलीच होती. तसेच आता महाराष्ट्रात एमआयएमबरोबर युती करणार नाही असे कसे म्हणता येईल असा सवाल उपस्थित करत ते भविष्यात एमआयएम, वायएसआर, वंचित आघाडीशीही युती करून सोयीनुसार राजकारण करतील, असा टोला खडसेंनी लगावला.

एका घरात 2 दोन चुली करायला, आम्हाला जबाबदार धरणार का? बडतर्फीनंतर खदखद बाहेर

माझ्याविरुद्ध बोलतो का, तुझ्या मागे ईडी लावतो. तुझ्या मागे अँटी करप्शन लावतो. तुझ्या कुटुंबाला जेलमध्ये टाकतो अशा प्रकारते गलिच्छ राजकारण सध्या सुरू आहे. त्यामुळे आता या राजकारणाची किळस येत आहे, असे नागरिक बोलतात.

Exit mobile version