तरीही दादांनी दोन मतं देऊन आमदार केलं, धनंजय मुंडेंनी सांगितलं ‘ते’ सिक्रेट
Dhananjay Munde News : उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे परळीत दाखल झाले. मंत्री धनंजय मुंडे यांचे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. मुंडेंवर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. त्यानंतर मुंडे परळीच्या वैजनाथ चरणी नतमस्तक झाले आहेत. छोटेखानी घेतलेल्या सभेत धनंजय मुंडेंनी मायबाप जनतेचे आभार मानत पहिल्यांदा जेव्हा विरोधी पक्षात असताना विधान परिषदेची निवडणूक लढवली त्यावेळी कमी पडत असलेली दोन मते अजितदादांनी देऊन मला विधिमंडळात पाठवलं असल्याचं भर सभेतच सांगितलं आहे.
शिंदेंवर टीका करायचे पण फडणवीसांना.., दादांच्या बंडानंतर काँग्रेस नेत्याचा मोठं विधान…
पुढे बोलताना ते म्हणाले, आजचा जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद कधी पाहिला नव्हता. जनतेचं हे प्रेम मिळवायला भाग्य लागतं. जीवनात दुसऱ्यांदा मंत्री झाल्यानंतर काय बोलावं, पण सांगायला अभिमान वाटतो या जिल्हातील प्रत्येकाला तुम्हाला शब्द दिला होता की, ज्या ज्या वेळेस राज्यात राजकीय पटलावर कैद करायचा योग येईल, त्या त्या वेळेस परळीच्या वैजनाथाला विचारल्याशिवाय काहीही होणार नसल्याचं म्हणताच जनसमुदायाकडून जोरदार टाळ्यांचा कडकडाट ऐकाय़ला मिळाला आहे.
48 वर्षांपूर्वी अजितदादा ठरले होते ‘टॉमेटो किंग’; जिल्ह्यात मिळाला होता विक्रमी भाव
तसेच सहा महिन्यांपूर्वी माझा अपघात झाला तेव्हा मी ब्रीचकॅंडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतो. त्यानंतर बरा होऊन आल्यानंतर जिल्ह्याच्या जनतेने प्रेम दिलं आधार दिला त्यावेळी मी फक्त आमदार होतो, आज मी मंत्री झालो आहे. मी कुठल्या पदावर जावं हे मला दिसत नाही, पण मी तुमच्या असावं म्हणून मला भगवंतानं अपघातातून वाचवलं असल्याचं ते म्हणाले आहेत.
‘वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असेल’; अजितदादांना अर्थखातं देण्यावरुन गुलाबरावांचे मोठे विधान
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी शेरोशायरी करीत विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, “समयने, वक्तने कुछ समय मेरा साथ क्या नही दिया की मेरे काबिलियत पे लोग शक करने लगे” जनतेच्या आशिर्वादाने आपण काबिल आहोत हे उभ्या महाराष्ट्राला नाहीतर देशाला दाखवून दिलं, असल्याचं ते म्हणाले आहेत.
पुढील काळात माय बाप जनतेची सेवा करणे हेच आपलं ध्येय असून सत्ता येत असते जात असते, सत्ता आल्यानंतर आणि जाताना काय फरक असतो हे मी पाहिलंय. माझी बांधिलकी जनतेशी असल्याचं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केलीय.