Shirdi Lok Sabha Election 2024 : शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये यंदा तिरंगी लढत पाहायला (Shirdi Lok Sabha Election 2024) मिळणार आहे. महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौरे तर महायुतीकडून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र आता दुरंगी लढतीमध्ये वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री झाली आहे. वंचितकडून उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने आता ही लढत तिरंगी झाली आहे. वंचित आघाडीने उमेदवारी दिलेल्या उत्कर्षा रूपवते नेमक्या आहेत तरी कोण? तसेच त्यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत जाणून घेऊ या…
रूपवते कुटुंबीय गेली अनेक वर्ष काँग्रेसची एकनिष्ठ म्हणून त्यांची ओळख ही राज्यभर होती. दादासाहेब रुपवते हे उत्कर्षा रुपवते यांचे आजोबा होते. दादासाहेब हे मोठे राजकारणी होते. 1978 मध्ये त्यांनी आमदारकी देखील भूषवली होती. तसेच 1972 ते 1975 आणि 1977 ते 1978 या कालावधीमध्ये त्यांनी दोनदा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्रिपद देखील भुषवले. तसेच उत्कर्षा रुपवते यांचे वडील स्व. प्रेमानंद रुपवते हे देखील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांत गणले जात होते. त्यांचाच वारसा आता उत्कर्षा रुपवते यांनी सुरू ठेवला आहे.
Madha Loksabha : देवेंद्र फडणवीसांना पुन्हा धक्का! आणखी एक धनगर नेता शरद पवारांच्या गोटात…
मोठा राजकीय वारसा लाभलेल्या उत्कर्ष या उच्चशिक्षित आहेत. काँग्रेस पक्षात असताना त्यांनी समाजकारणाला जास्त प्राधान्य दिले. त्यामुळे आजही त्या जनमानसात ओळखल्या जातात. काँग्रेसमध्ये असताना गाव पातळीवर त्यांनी पक्षाचे चांगले संघटन निर्माण केले. काँग्रेसच्या प्रभारी म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेरही इतर राज्यांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला. तसेच वेळोवेळी पक्षाकडून देण्यात आलेली जबाबदारी देखील त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. यामुळे रूपवते यांचं नाव अन्य राज्यांतही घेतलं जातं हे विशेष.
आरक्षित असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर झाली. वाकचौरेंना पक्षातूनच विरोध होऊ लागला. काँग्रेसमधून उत्कर्षा रुपवते यादेखील इच्छुक होत्या. मात्र ठाकरे गटाला ही जागा गेल्याने रुपवते नाराज होत्या. अनेक वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेल्या रूपवते यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षातून बाहेर पडल्या. मोठा राजकीय वारसा लाभलेल्या रुपवते यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्ष प्रवेश केला. रूपवते यांना लोकसभेची उमेदवारी देखील जाहीर झाली.
Utkarsh Rupwate : तेव्हा आजी-माजी खासदार कोणत्या बिळात लपले होते.. रुपवतेंचा हल्लाबोल
शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये दुरंगी लढत होणार अशी चर्चा होती. मात्र उत्कर्षा रुपवते यांनी वंचित आघाडीत प्रवेश करत ही लढत तिरंगी केली. ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरेंना ही निवडणूक जड जाणार तसेच मतदारसंघामध्ये जनसंपर्क नसलेले व मतदारसंघामध्ये फारसा वावर नसलेले विद्यमान खासदार लोखंडे यांच्यावर देखील जनता नाराज आहे. तिसरा पर्याय म्हणून रूपवते यांची एन्ट्री ही चांगलीच चर्चेत आहे. आजी माजी विरोधात असलेली नाराजी पाहता रूपवते यांना मिळणारा प्रतिसाद हा वाकचौरे व लोखंडे यांना नक्कीच घाम फोडणारा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.