अन् भरसभेत उत्कर्षा रुपवते यांना बाळासाहेबांचा आला फोन, म्हणाले…
Utkarsha Rupwate On Sadashiv Lokhande : शिर्डीमधून (Shirdi) वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) उमेदवार उत्कर्षा रुपवतेंनी (Utkarsha Rupwate) त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी वंचित बहुजन आघाडीने कार्यकर्त्यांची प्रचंड सभा घेतली. त्यानंतर वंचितने उत्कर्षा रुपवते यांची प्रचंड रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे.
रुपवते यांची सभा सुरू असतानाच ऍड. बाळासाहेब आंबेडकर (Balasaheb Ambedkar) यांनी फोन करून वंचितचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना निवडणूक निकराने लढण्याचे आदेश दिले. वाहन किंवा कोणत्याही साधनांच्या अभावामुळे कार्यकर्त्यांनी अडून न राहता उत्कर्षा रुपवतेंना बहुमताने निवडून आणण्यासाठी मेहनत करावे, असे आदेश दिले. सोबतच त्यांनी उत्कर्षा रुपवते यांना निवडणूकीसाठी शुभेच्छा दिल्या.
उत्कर्षा रुपवते यांची टोलेबाजी..
यावेळी उत्कर्षा रुपवते यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा नाव न घेता समाचार घेतला.एक उमेदवार हे ‘मिस्टर इंडिया’ असून मतदारसंघात कधीच दिसत नाहीत,असा टोला सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांना लगावला. दुसरे उमेदवार हे एकदा रिटायर झाले असून आता त्यांना राजकारणातून कायमचे रिटायर व्हायची वेळ आली आहे, अशी टीका रुपवतेंनी भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Vakchoure) यांच्यावर केली.
वाकचौरे आणि लोखंडे हे फक्त एकमेकांवर घोटाळ्याचे आरोप करतात ,पण महिला युवा, शेतकरी यांच्या समस्यांबद्दल एक शब्द ही काढत नाही, अशी टीका रुपवते यांनी केली.
यावेळी वंचितच्या राज्य उपाध्यक्ष आणि प्रवक्त्या पिंकी दिशा शेख यांनी वाकचौरे आणि लोखंडे हे जनतेच्या मुलभूत प्रश्नांवर मौन बाळगून आहेत अशी टीका केली.
सावधान..! चीनी कीबोर्डमध्ये गंभीर धोका, काहीही टाइप करा उघड होणारच; नवा शोध नेमका काय ?
दरम्यान, शिर्डीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते आणि महायुती भाजपचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यात मुख्य लढत होणार आहे.