‘मी थकणारा नाही चालणारा लोकप्रतिनिधी’; सदाशिव लोखंडेंचे विरोधकांना खडेबोल
Shirdi Loksabha : शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये (Shirdi Loksabha) तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे, (Bhausaheb Wakchoure) शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) तर काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या उत्कर्षा रूपवते (Utkarsha Rupwate) यादेखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत. और बोलताना लोखंडे म्हणाले लोकशाहीमध्ये सर्वांना उमेदवारी करण्याचा हक्क असतो. शिर्डीकर योग्य तो निर्णय घेतील असं मला विश्वास आहे. मी थकणारा नाही तर चालणारा लोकप्रतिनिधी आहे अशा शब्दात यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहे.
मोठी बातमी : भीमा कोरेगावर हिंसाचार प्रकरणात प्रा. शोमा सेन यांना सात अटीशर्तींसह जामीन
यावेळी बोलताना खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की, लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून पुन्हा एकदा जनता यांना पंतप्रधान करण्यासाठी सज्ज झाली आहे. यामुळे शिर्डी मतदारसंघातून पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार म्हणून मला संधी मिळाले आहे. सलग तिसऱ्यांदा शिर्डीकर मला निवडून देतील, असा विश्वास देखील यावेळी लोखंडे यांनी व्यक्त केला.
‘पावसाच्या अंदाजासारखाच मतरुपाने पाऊस पाडा’; पंजाबराव डख यांची परभणीकरांना साद
मी थकलेला खासदार नाही…
सदाशिव लोखंडे हे विद्यमान खासदार असून ते मतदारसंघात फिरतच नाही अशी ओरड ही विरोधकांकडून केली जात आहे. यावर लोखंडे म्हणाले, मी थकणारा नाही तर चालणारा लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघातील जनता ही जशी 2014 व 2019 ला माझ्या पाठीमागे उभे राहिले. तसेच ते 2024 ला देखील मला साथ देतील, असा विश्वास देखील यावेळी लोखंडे यांनी व्यक्त केला.
सुधीर मुनगंटीवारांसाठी PM मोदींची चंद्रपुरात पहिली सभा; प्रचाराचं रणशिंग फुंकणार
पुढे बोलताना लोखंडे म्हणाले, नगरसेवक झेडपी सदस्य आमदार आणि खासदारांमध्ये फरक आहे. नगरसेवक आमदार जेवढे फिरू शकतात तेवढे खासदारही फिरू शकत नाही. मात्र जनतेच्या कामांसाठी आम्ही फिरतो असे शब्दातच लोखंडे यांनी विरोधकांना सुनावलं. विरोधकांना जरी याबाबत शंका असेल तर भविष्यात मी पुन्हा एकदा खासदार झालो तर प्रत्येक तालुक्यामध्ये जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवेल, असं देखील लोखंडे म्हणाले आहेत.