Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात पुन्हा बदल होऊ (Weather Update) लागला आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून थंडी कमी झाली आहे. तर आता पावसाचीही शक्यता व्यक्त होत आहे. थंडीच्या दिवसांत शक्यतो पाऊस होत (Rain Alert) नाही. मात्र आता हवामानातील बदलामुळे अशी चिन्हे दिसू लागली आहेत. उद्यापासून (२५ डिसेंबर) ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज आहे. २६ ते २८ डिसेंबर पर्यंत हलका पाऊस होईल असा अंदाज आहे.
मागील दोन आठवड्यांत राज्यात कडाक्याची थंडी पडली होती. राज्यात इतकी थंडी कधी जाणवत नव्हती. अनेक शहरात तापमान ६ अंशांच्या खाली गेले होते. आता मात्र थंडीची ही लाट ओसरली आहे. पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे. हवामान विभागानुसार वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गारपीट होऊ शकते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Train : फक्त एक मेसेज केल्याने TC धावत येईल मदतीला; ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी खास सुविधा
दक्षिणेतून बाष्पयुक्त वारे राज्यात येणार आहे. त्यामुळे पावसाची स्थिती निर्माण होईल. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज आहे. अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
केळी, द्राक्ष, पपई यांसह भाजीपाल्याचे अवकाळी पावसाने नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या काळात शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.