Ahilyanagar News : आमदार संग्राम जगताप यांनी (Sangram Jagtap) रस्ते विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. त्यातून अनेक रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. त्याचबरोबर आरोग्यसेवा, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, चौकांचे सुशोभिकरण…उद्यानाचे नूतनीकरण करून शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला. सावेडी उपनगरातील वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करून आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून सावेडीतील पाइपलाइन भागात रोड भागात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येत आहे.
आमदार संग्राम जगताप यांनी (Sangram Jagtap) पाठपुरावा करून सुवर्णजंयती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर योजनेतून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 60 लाख रुपयांची निधी मंजूर झालाय. तर अॅकोमोडेशन आणि रिझर्वेशन पॉलिसीमधून सावेडी येथे 50 बेडचे 15000 स्केअर फूट परिसरात अद्ययावत हॉस्पिटलचे काम प्रगतीपथावर आहे.
शहरातील नागरिकांना अद्यावत आरोग्यसेवा मिळविण्याचे स्वप्न संग्राम जगताप यांनी पाहिले होते. हे स्वप्न आता आकार घेऊ लागले आहे. बुरुडगाव परिसरात महानगरपालिकेचे 150 बेडचे अद्यावत सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी सुरू आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना महागड्या आजारांवरील उपचार या हॉस्पिटलमध्ये मिळणार आहे. त्यात शहरातील नामांकित डॉक्टरांचे सहकार्य घेऊन रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.
MLA Sangram Jagtap : नगरकरांना वेठीस धरु नका, आमदार संग्राम जगतापांनी सुनावलं
खेळाडूंच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवत संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून अद्ययावत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स शहरात उभे राहणार आहे. वाडिया पार्क क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी आणि विकासासाठी 51 कोटींचा निधी मंजूर झालाय. त्यापैकी 15 कोटी 50 लाख रुपयांचा पहिला टप्पा वर्ग झालाय. त्यातून क्रिकेटसाठी टर्फ, ग्रीन ग्रास, फ्लड लाइट, स्क्रिंकलर, चारशे मीटरचा सिथेंटिक ट्रक, बॉस्केटबॉल, व्हॉलीबॉल या खेळांडूसाठी सुविधा तयार करण्यात येत आहे.
सारसनगर परिसरात दोन एकर जागेत स्पोर्ट्स कॉम्पेक्स उभारले जात आहे. त्यासाठी 11 कोटींचा निधी मिळालय. या संकुलात बॅडमिंटन, लॉन टेनिस, बॉस्केटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस अशा विविध खेळांसाठी सुसज्ज मैदाने तयार होत आहेत.
गंगा उद्यान परिसरात नवीन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 6 कोटी 50 लाखांचा निधी मिळालाय. त्यातून स्विमिंग पूल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, योगा हॉल, वॉकिंग ट्रॅक, व्हॉलीबॉल, खो-खो ग्राउंड अशा गोष्टींचा समावेश आहे.
विकासकामांवर नागरिकांचा विश्वास, आमदार संग्राम जगतापांच्या स्वागतासाठी नालेगाव ग्रामस्थ एकवटले
चौकांचे सुशोभिकरण आणि उद्यानांच्या नूतनीकरणातून शहराला नवे रुप दिले जात आहे. बुरुडगाव रोड भागात अहिंसा चौक, सी. ए. फाउंडेशन चौक, स्वस्तिक चौक येथे चौक सुशोभिकरण करण्यात आले. त्यात कल्पकता दाखवत धार्मिक, शैक्षणिक दृष्टीकोन दाखविला. शहरातील उड्डाणपुलाच्या खांबावर शिवचरित्र रेखाटले गेले. गंगा उद्यानाचे नूतनीकरण आणि संगीत कारंजे निर्माण करण्यात आले. तर भिस्तबाग महालाचे नूतनीकरणासाठी 3 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर केलाय. संग्राम जगताप यांनी शहरांचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय ठेवले होते. त्यातून शहराला आता नवे रुपडे मिळाले आहे.