Ahmednagar News : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून चांगलाच वाद पेटला आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) हे प्रयत्नशील आहेत. यामुळे सध्या मनोज जरांगे व मंत्री भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. यावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी यांनी जोरदार टीका केली आहे. राजकारणात सध्या राजकारण्यांची भाषा खालावत चालली असून भुजबळ जी भाषा वापरत आहेत ती चुकीची आहे, ते सगळं चुकीचे बोलतात…ते काय पिऊन बोलत आहे की काय? अशी शंका येत असल्याची खोचक टीका यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी केली.
ट्रक ड्रायव्हर्सचा प्रवास होणार ‘गारेगार’: नितीन गडकरींच्या मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन पुण्यात होणार आहे, अधिवेशनाच्या तयारीची आढावा बैठक पार पडली. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप म्हणाले, आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात यावी या आशयाचे पत्र आम्ही केंद्राला पाठवले आहे. तसेच कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता घटना दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवा परंतु आरक्षण आम्हाला ओबीसीतूनच द्या, अशी मागणी यावेळी मराठा महासंघाने केली आहे.
‘ओबीसी-मराठा बांधवांनी एकमेकांच्या अंगावर..,’; किल्लारीच्या सभेत जरांगेंनी दिली मोठी जबाबदारी
भुजबळांवर शाब्दिक टीका :
मराठा आरक्षण व ओबीसी यांच्यामध्ये सध्या जो वाद सुरु आहे याला कारणीभूत छगन भुजबळ आहे. भुजबळांनी याला सुरुवात केली आहे. सभेला पैसे कोठून आले कसे आले हे भुजबळांनी सुरु केले. भुजबळ हे अनुभवी नेते असताना त्यांनी यामध्ये पडायला पाहिजे नव्हते. तुम्ही जे भाष्य करत आहात ते थांबवा व दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी भाष्य करू नका. आरक्षणाबाबत जो काही निर्णय घ्यायचा तो सरकार घेईल. उद्या जर आरक्षणाबाबत निर्णय झाला तर भुजबळ काय राजीनामा देणार आहे का? सवाल देखील त्यांनी केला.
Road Accident : टायर फुटला अन् डंपरला धडकून कार पेटली; 8 प्रवाशांचा जळून मृत्यू
भुजबळांना मोठे करण्यात मराठ्यांचे देखील योगदान आहे हे तुम्ही विसरलात का असा सवाल यावेळी मराठा महासंघाने केला. तसेच सध्या राज्यातील परिस्थिती व राजकीय नेत्यांची भाषा पहिली तर महाराष्ट्राचा बिहार नाही तर बिहार सारखा महाराष्ट्र झाला आहे. शिवरायांच्या या महाराष्ट्रात आज राजकारण अगदी तळागाळाला गेले आहे. आज राजकीय नेते सोशल मीडियावर ज्या भाषेत बोलत आहे हे त्यांना शोभत नाही. तुम्ही येणाऱ्या पिढीला काय संदेश देताल? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.