Download App

Maratha Reservation : मनोज जरांगेंनंतर कोपर्डीतही आंदोलकांची तीच भूमिका…

Maratha Reservation : मराठा आरक्षण आणि जालन्यातील आंतरवली सराटीत झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ अहमदनगरमधील कोपर्डीमध्येही मराठा समाजाकडून उपोषण करण्यात आलं आहे. या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून जोपर्यंत आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांकडून घेण्यात आला आहे.

PGCIL Recruitment 2023 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, पगार 27,000 हजार रुपये

गेल्या काही दिवसांपासून जालन्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण केले आहे. या आंदोलनादरम्यान, आंदोलन मनोज जरांगे यांनी पोलिस उपचारासाठी घेऊन जात असताना अचानक आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर हे आंदोलन राज्यभरात चर्चेत आलं आहे. पोलिसांनी लाठीचार्ज केला तरीही मनोज जरांगे यांंचं आंदोलन अद्यापही सुरुच असून त्यांनी आरक्षणासंदर्भातील अध्यादेश काढण्यासाठी सरकारला चार दिवसांची मुदत दिली आहे.

मारीच्या पॅकेटमध्ये एक बिस्किट कमी; ITC कंपनीला ग्राहक न्यायालयाचा मोठा दणका

एकीकडे मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण सुरु आहे, तर दुसरीकडे कोपर्डी गावातही मराठा समाजासह ग्रामस्थांच्यावतीने उपोषण सुरु करण्यात आलं आहे, या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून आंदोलनकर्ते म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोन दिवसांपासून उपोषण सुरु असून आमचं आंदोलन शांतेतत सुरु आहे, आमच्या आंदोलनाची तत्काळा शासनाने दखल घेऊन, मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा जोपर्यंत अध्यादेश काढत नाहीत तोपर्यंत कोपर्डीतही आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.

‘आमच्या भूमिकेवरच निवडणूक आयोग शिक्कामोर्तब करणार’; सुनिल तटकरेंनी व्यक्त केला विश्वास

कोपर्डीत सुरु असलेल्य आंदोलनात कोपर्डी गावातील सर्वच ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला असून यामध्ये शेतकरी वर्ग, शाळकरी विद्यार्थी, वृद्धांसह सर्वच नागरिकांनी हे आंदोलन सुरु ठेवलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात सुरु असलेल्या आंदोलनांची दखल घेऊन सरकारने मंत्रिमंडळ समिती स्थापन केली असून मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समितीला दिले आहेत.



ढंपर भरुन पुरावे देतो :

सरकारला अध्यादेश काढता येतील एवढे पुरावे आपल्याकडे आहेत. सरकारला चार दिवसांचा वेळ दिला आहे. पण सरकारला वेठीस धरायचे नाही. तुम्ही यावे आणि हे कागदपत्रे घेऊन जावीत. रिक्षा आणि ढंपरभरुन पुरावे द्यायला तयार आहोत. त्यामुळे ही कागदपत्रे घेऊन तात्काळ अध्यादेश काढावा, अशी विनंती मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले.

Tags

follow us