Chhagan Bhujbal : राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हजारो समाजबांधवांसह मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यानंतर 26 जानेवारीला मुंबईत उपोषण करणार होते. मात्र, त्याआधीच राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. राज्य सरकारने जरांगे पाटील यांना दिलेल्या मसुद्यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सरकारच्या निर्णयावर ओबीसी नेते कमालीचे नाराज झाले आहेत. अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पुन्हा एकदा मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली.
Manoj Jarange : मराठा आरक्षण मार्गी लागल्यानंतर राजकारणात येणार का? जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात, आम्ही ऐकतो पण आमच्या मनाचं समाधान होत नाही. हट्ट पुरवण्याचे काम सरकार करत आहे. मराठा आरक्षण केले सारथीमध्ये पण तेच महाज्योतीतही तेच. कुठे तर क्लिअॅरिटी देणार आहात की नाही ओबीसी समाजात. ओबीसी समाजही मतदान करतो. हे सर्व हट्ट पुरवण्याचे काम सरकार करत आहे. कुणावरही अन्याय होणार नाही असं म्हणत आहेत पण आता तर 54 लाख नोंदी सापडल्या आहेत त्यामुळे धक्का लागणारच आहे, असे भुजबळ म्हणाले.