Download App

Maratha Reservation साठी आमदार काळेंनी घातलं अजित दादांना साकडं; म्हणाले…

  • Written By: Last Updated:

Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. यातच आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नसल्याने आता मराठा समाज देखील आक्रमक होत असून याला राजकीय पाठिंबा देखील मिळू लागला आहे. नुकतेच कोपरगाव मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार (अजित पवार गट) आशुतोष काळे यांनी मराठा आरक्षण प्रश्नी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. सरकारने उपोषणाची दाखल घेत हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी विनंती आमदार काळे यांनी अजित पवारांना केली आहे.

नाथाभाऊंची लोकसभा लढण्याची इच्छा : भाजपकडून रक्षा खडसेंची उमेदवारी कन्फर्म; लीडही जाहीर!

काळेंनी ट्विटरद्वारे दिली माहिती

मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कोपरगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने कोपरगाव येथे सुरु असलेल्या आमरण उपोषणाची सरकारने तातडीने दखल घ्यावी अशी विनंती केली. तसेच कोळगाव थडी येथे मुस्लिम बांधवांच्या पवित्र कुराणची विटंबना झाल्याच्या घटनेची चौकशी करून दोषींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली.

मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबितच

Sonu Sood: सोनू सूद ठरला ‘मोस्ट स्टायलिश उद्योजक’

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलने तसेच उपोषणे करण्यात आले, मात्र अद्यापही हा प्रश्न प्रलंबितच आहे. यातच जालना येथे मनोज जरांगे आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहे. उपोषणस्थळी काही दिवसांपूर्वी पोलिसांकडून उपोषणकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली व ठिकठिकाणी आंदोलने करत सरकारचा निषेध करण्यात आला. नगर जिल्ह्यात देखील या घटनेचे पडसाद उमटले होते.

follow us