मॅकडोनाल्डवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केल्याची प्रकार उघडकीस आला आहे. खाण्याच्या पदार्थांमध्ये प्रत्यक्ष चीज न वापरता चीजसारख्याच पदार्थांचा वापर केला जात असल्याचं समोर आलं आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून सुरक्षा मॅकडोनाल्डला सर्वच पदार्थांच्या नावातून चीज शब्द काढण्याबाबतचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानंत आता पदार्थांतून ‘चीज’ शब्द काढून टाकत पदार्थांची नवी नावे जाहीर करण्यात आली आहे. अहमदनगर येथील ‘मॅकडोनॉल्ड’ रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या विविध पदार्थांमध्ये चीजसदृश्य पदार्थ वापरला जात होता.
“तू तुझ्या पक्षाचं बघ नाहीतर सुपडा साफ होईल”; एकेरीवर येत जरांगेंचा वडेट्टीवारांवर घणाघात
मागील अनेक दिवसांपासून मॅकडोनॉल्ड रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या पदार्थांमध्ये चीजसारख्याच एका पदार्थाचा वापर करण्यात येत होता. त्यानंतर अन्न व सुरक्षा आयुक्तांच्या पदाधिकाऱ्यांकडून मॅकडोनाल्डला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे राजेश बढे आणि डॉ. बी. डी. मोरे या अधिकाऱ्यांनी कारवाईचा इशारा दिला होता. अन्न व सुरक्षा आयुक्तांच्या आदेशाचे पालन केले जात नसल्यामुळे अखेरीस या पदार्थांची विक्री थांबविण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मात्र ‘मॅकडोनॉल्ड’ रेस्टॉरंटची साखळी चालविणाऱ्या कंपनीने अखेरीस आपण पदार्थांची नावे बदलल्याचे पत्र या अधिकाऱ्यांना दिले आहे.
महाविकास आघाडीचं जागावाटप कधी फायनल होणार? नाना पटोलेंनी थेट तारीखच सांगितली
पदार्थांची नावे बदलली…
अमेरिकन वेज बर्गर (कॉर्न अॅण्ड चीज बर्गर), अमेरिकन नॉन-वेज बर्गर (ग्रील्ड चिकन अॅण्ड चीज बर्गर), ब्ल्यु बेरी केक (ब्ल्यु बेरी चीज केक), इटालियन वेज- नॉन वेज बर्गर (चीजी इटालियन वेज- नॉन वेज बर्गर). बदललीवेज नगेटस (चीझी नगेटस), चेड्डार डिलाईट वेज – नॉनवेज बर्गर (मॅक चीज वेज – नॉनवेज बर्गर) कंसात जुनी नावे जुनी नावे दिली आहेत.
भारतीय विमानतळ प्राधिकरणात बंपर भरती, महिन्याल १ लाखाहून अधिक पगार, कधीपर्यंत करता येणार अर्ज?
दरम्यान, आमच्या सर्व उत्पादनांमध्ये फक्त शुद्ध, दर्जेदार चीज वापरतो. आम्ही या विषयावर संबंधित अधिकाऱ्यांसोबत सक्रियपणे काम करत असून आमच्या घटकांमधील पारदर्शकता असून वचनबद्धता आणि आमच्या ग्राहकांना स्वादिष्ट, उच्च दर्जाचे खाद्यपदार्थ देण्याप्रती समर्पितता अतूट असल्याचा खुलासा मॅकडोनॉल्ड’कडून देण्यात आला आहे.