एमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांना ध्यानधारणेची पुस्तके भेट

Asuddin Owaisi: प्रेरक वक्ता बी के शिवानी दिदी यांचे “बिंग लव्ह” व “द पॅावर अॅाफ वन थॅाट” ही पुस्तके भेट दिली.

Meditation books presented to MIM President Asuddin Owaisi

Meditation books presented to MIM President Asuddin Owaisi

अहिल्यानगर : जगभरात 143 देशात ध्यानधारणा शिकवणाऱ्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने ध्यानधारणा प्रशिक्षक बी के डॉ. दीपक हरके व अहिल्यानगर सेवा केंद्राच्या सहसंचालिका बी के सुप्रभा व बी के उज्वला यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) चे अध्यक्ष व खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांची शासकीय विश्राम गृहामध्ये भेट घेतली. यावेळी त्यांना संस्थेच्या कार्याची माहिती देऊन सुप्रसिद्ध प्रेरक वक्ता बी के शिवानी दिदी यांचे “बिंग लव्ह” व “द पॅावर अॅाफ वन थॅाट” ही पुस्तके भेट दिली.

तसेच संस्थेच्या आंतरराष्ट्रीय मुख्यालय असलेल्या माऊंट अबूला भेटीचे निमंत्रण दिले. यावेळी माजी खासदार व ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM)चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील उपस्थित होते. (Meditation books presented to MIM President Asuddin Owaisi)

ध्यानधारणे बद्दल माहिती देताना ध्यानधारणा प्रशिक्षक बी के डॉ. दीपक हरके यांनी सांगितले की , राजयोग ध्यान हा ध्यानाचा एक प्रकार आहे. जो सर्व पार्श्वभूमीच्या लोकांसाठी प्रवेश योग्य आहे. हे विधी किंवा मंत्रांशिवाय एक ध्यान आहे आणि कधीही कुठेही सराव करता येतो. राजयोग ध्यानाचा सराव ‘उघड्या डोळ्यांनी’ केला जातो. ज्यामुळे ध्यानाची ही पद्धत बहुमुखी, सोपी आणि सराव करण्यास सोपी बनते. ध्यान ही त्या ठिकाणी असण्याची अवस्था आहे जी दररोजच्या चेतनेच्या पलीकडे असते.


Video : मुख्यमंत्र्यांकडून गृहराज्यमंत्री कदमांना ‘क्लीन चीट’; घायवळच्या शस्त्र परवान्याबद्दल मोठा खुलासा

जिथे आध्यात्मिक सशक्तीकरण सुरू होते. आध्यात्मिक जागरूकता आपल्याला नकारात्मक आणि व्यर्थ विचारांपेक्षा चांगले आणि सकारात्मक विचार निवडण्याची शक्ती देते. आम्ही परिस्थितींवर प्रतिक्रिया देण्याऐवजी त्यांना प्रतिसाद देऊ लागतो. आपण सुसंवादाने जगू लागतो, आपण अधिक चांगले आणि आनंदी, निरोगी संबंध निर्माण करतो आणि आपले जीवन सर्वात सकारात्मक मार्गाने बदलतो, असे डॉ. दीपक हरके म्हणाले.

Exit mobile version