‘परमात्मांचा संदेश’ पुस्तकाचे प्रकाशन; ‘एक संवाद..प्रदीप सरांशी’ कार्यकमातून मुखर्जी संवाद साधणार

प्रदीप मुखर्जी लिखित परमात्मांचा संदेश पुस्तकाचे अहमदनगरमध्ये प्रकाशन करण्यात येणार असून एक संवाद प्रदीप सरांशी या कार्यक्रमातून प्रदीप मुखर्जी संवाद साधणार आहेत.

Padip Mukharji Message from god

Padip Mukharji Message from god

Message From God Book : अहमदनगरमध्ये अध्यात्मिक मार्गदर्शक प्रदीप मुखर्जी (Pradip Mukharji) लिखित ‘मॅसेज फ्रॉम गॉड’ (Message From God) पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘परमात्मांचा संदेश’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. शहरातील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात पुस्तक प्रकाश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून या प्रकाशन सोहळ्याला उद्योजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांच्यासह आदर्श गाव समितीचे संचालक पोपटराव पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अलख गॉड फाऊंडेशनच्यावतीने पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय.

फेक आयडीवर महिनाभर चॅटिंग अन् कोयत्याने सपासप वार, पुण्यात ‘असा’ घेतला मित्राच्या खुनाचा बदला

अध्यात्मिक मार्गदर्शक प्रदीप मुखर्जी लिखित ‘मॅसेज फ्रॉम गॉड’ या प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘परमात्मांचा संदेश’ पुस्तक रुपात तयार करण्यात आला आहे. अलख गॉड फाऊंडेशन तर्फे हा पुस्तक प्रकाशन सोहळा रविवारी (ता. ८) सकाळी १० वाजता नगर शहरातील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात होणार आहे. या अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन भगवतीच्या प्रेमळ ऊर्जेचा वर्षाव करणाऱ्या फाल्गुनी पाठक व परमात्मांचे संदेशवाहक प्रदीप मुखर्जी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. पुस्तक प्रकाश सोहळ्याला अहमदनगरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अलख गॉड फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आलंय.

मोठी बातमी! राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी राष्ट्रवादीची तीन नावं फायनल?

‘एक संवाद..प्रदीप सरांशी’ कार्यक्रमातून प्रदीप मुखर्जी संवाद साधणार
परमात्मांचा संदेश पुस्तकाच्या मराठी अनुवाद तयार करण्यता आलायं. या पुस्तकाचे प्रकाश अहमदनगरमधील सहकार सभागृहात पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी परमात्मांचे संदेशवाहक प्रदीप मुखर्जी स्वत: उपस्थित राहणार असून सोमवारी 9 सप्टेंबर रोजी नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात मुखर्जी ‘एक संवाद..प्रदीप सरांशी’ कार्यक्रमातून उपस्थित नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

Exit mobile version