मोठी बातमी! राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी राष्ट्रवादीची तीन नावं फायनल?

मोठी बातमी! राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी राष्ट्रवादीची तीन नावं फायनल?

Maharashtra Politics : राज्यपालांकडून विधानपरिषदेतील बारा आमदारांची नियुक्ती बऱ्याच दिवसांपासून रखडली आहेत. आता या आमदारांच्या नियुक्त्या होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची यादी लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने यासाठी आपल्या पक्षातील तीन नेत्यांची नावं निश्चित केल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी खासदार आनंद परांजपे आणि सिद्धार्थ कांबळे यांचा समावेश असल्याची माहिती आहे.

पुणे : अजित पवार गटाचे मंगलदास बांदल अडचणीत; एकाचवेळी सहा ठिकाणी ईडीची छापेमारी

राज्यपालांच्या कोट्यातून बारा आमदारांची नियुक्ती विधानपरिषदेत होणार आहे. कुणाली नियुक्त करायचं याचा निर्णय राज्यपाल घेणार आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (MVA) असताना भगतसिंह कोश्यारी राज्यपाल होते. तेव्हा हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यात अनेकदा वादाचे प्रसंगही घडले होते. राज्यपालांकडून यादी मंजूर करण्यासाठी विलंब केला जात असल्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं. यानंतर आता महायुती सरकारच्या (Mahayuti Government) काळात विधानसभा निवडणुकीआधी नियुक्त्या होतील अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.

राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी लवकरच जाहीर होईल. यामध्ये कुणाला संधी द्यायची यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रफुल्ल पटेल यांच्याच चर्चा झाली होती. यामध्ये भाजपला सहा शिंदेंना तीन आणि अजित पवार गटाला तीन जागा देण्याची तयारी झाली. आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच या नावांना मंजुरी देऊन यादी राज्यपालांकडे पाठविण्यात येईल असे सांगितले जात आहे.

याआधी अजित पवार यांनीही (Ajit Pawar) या मुद्द्यावर भाष्य केले होते. यादी 30 ऑगस्ट आधीच जाहीर होईल असे त्यांनी सांगितले होते. यामध्ये थोडासा उशीर झाला आहे. तसेही विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची (Maharashtra Elections) शक्यता आहे. अशा परिस्थितीत आधी या बारा आमदारांची नियुक्ती करण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे. त्यानुसार कार्यवाही केली जात आहे. आता या राज्यपाल नियुक्त बारा जागांवर कुणाला संधी मिळेल, कोण आमदार होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ऐन विधानसभेपूर्वी अजितदादांच्या अडचणीत वाढ, शिखर बॅंक घोटाळ्यातील क्लीन चिट विरोधात चार नवीन याचिका दाखल

follow us
  • fb
  • instagram
  • youtube