Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबीर शिर्डीत सुरू झाले आहे. या शिबिराला पक्षाच्या नेते पदाधिकाऱ्यांनी जमण्यास सुरुवात केली आहे. नाराज असलेल्या छगन भुजबळांनीही अधिवेशनाला हजेरी लावली आहे. परंतु, धनंजय मुंडे मात्र या अधिवेशनाला हजर राहणार नाहीत अशी माहिती समोर आली आहे. मंत्री मुंडे या शिबिराला हजर राहतील असे आधी सांगण्यात आले होते. आता मात्र नवी माहिती समोर आली आहे. या अधिवेशनाला धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती मुंडे यांच्या कार्यालयाने दिली आहे.
नाराजीनाट्यानंतर पहिल्यांदाच भुजबळ-अजितदादा आमनेसामने? शिर्डीत शिबीर, भुजबळांबाबत संभ्रम
या अधिवेशनाला धनंजय मुंडे हजर राहणार नाहीत. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते आज परळीतच राहणार आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते की धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ या अधिवेशनाला उपस्थित राहतील. यातील छगन भुजबळ आज शिर्डीत दाखल झाले आहेत. मात्र धनंजय मुंडे या शिबिराला येणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधी आमदार चव्हाण शरद पवार गटात आले होते. त्यावेळी चव्हाण यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं. परंतु, निवडणुकीनंतर राजकारण पूर्ण बदललं आहे. महायुती सोडून गेलेले नेते पुन्हा स्वगृही परतू लागले आहेत. यातच चव्हाण यांचाही समावेश आहे. परत येत आहेत म्हटल्यानंर राष्ट्रवादीनेही त्यांचं निलंबन मागे घेतलं आहे. आमदार सतीश चव्हाण आज या अधिवेशनात अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच येथील काही स्थानिक नेते शरद पवारांची साथ सोडणार आहेत. माजी आमदार विलास लांडे या निवडणुकीत अजित पवार गटासाठी काम करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. तसेच त्यांचे नातलग अजित गव्हाणे आणि अन्य वीस माजी नगरसेवक लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.