Download App

तुम्ही काँग्रेस पक्ष कुठे नेऊन गहाण टाकला…; महसूलमंत्री विखेंचे थोरातांवर टीकास्त्र

  • Written By: Last Updated:

अहमदनगर – लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय नेते मंडळीकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आता भाजपचे नेते राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांनी कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचे (Balasaheb Thorat) नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. देशातील राज्यातील स्वतःला काँग्रेसचे मोठे नेते समजता, पण दुर्दैवाने जिल्ह्यात एक जागा काँग्रेसच्या वाट्याला आणता आली नाही. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या वेळी तुमचे बेडगी प्रेम जनतेने पाहिले, अशी टीका विखेंनी केली.

तुम्ही काँग्रेस पक्ष कुठे नेऊन गहाण टाकला…; महसूलमंत्री विखेंचे थोरातांवर टीकास्त्र 

संगमनेरमध्ये मालपाणी लॉन्स येथे संकल्प महाविजयाचा या मेळाव्यात भाजपचे स्टार प्रचारक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी मंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत, शिर्डी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश काळे, भाजपाचे तालुका प्रमुख वैभव लांडगे, शहराध्यक्ष ऍड. श्रीराम गनफुले, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, कपिल पवार, जावेद जहागिरदार, राहुल भोईर आदी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

मतदारांनी ‘लक्ष्मी’ स्वीकारावी अन् मतदान करावे; प्रतिभा धानोरकरांचे वादग्रस्त विधान 

यावेळी बोलतांना विखे म्हणाले, जिल्ह्यात एक जागा काँग्रेसच्या वाट्याला आणता आली नाही आणि दुसऱ्याला पक्ष निष्ठा शिकवता. तुमच्या कोणत्या निष्ठा आहेत? काँग्रेस पार साफ झाली आहे. तुम्ही काँग्रेस पक्ष कुठे नेऊन गहाण टाकला? असा सवाल विखेंनी केला. गरीब श्रीमंतांची लढाई, असे वक्तव्य तुम्ही करता. मग इथे तयारीला लागा. संगमनेरमध्ये गरीब श्रीमंतांची लढाई लावू. आपण काय बोलतो? काय वक्तव्य करतो, हे तरी जरा पहात जा, असा सल्ला विखे पाटील यांनी आमदार थोरातांना नाव न घेता दिला आहे.

संविधान धोक्यात नाही यांचे अस्तित्व धोक्यात
यावेळी पुढे बोलताना विखे म्हणाले की, संविधान धोक्यात नाही, लोकशाही धोकात नाही यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. साकुरच्या मुलीवर अत्याचर झाला हे साधे त्या कुटुंबियांना भेटायला गेले नाहीत. त्यांचेच बगलबच्चे यात आहेत. हे त्यांना पाठीशी घालतात त्यांचे समर्थन करतात पण आम्ही यांना धडा शिकवू, असंही विखे म्हणाले.
विकासाचे रोल मॉडेल म्हणवून घेतांना 100 टँकर तालुक्यात चालू आहेत. हेच विकासाचे रोल मॉडेल का?जनतेला 40 वर्षे पाणी मिळाले नाही. भोजपुरचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे. सगळे ठेकेदार यांचेच आहेत, अशी टीकाही विखेंनी केली.

विकासाचे मॉडेल टँकरमुक्त असायला पाहिजे. कोणती योजना काँग्रेसने दिलीये, असा सवाल करत फक्त घराघरात भांडण लावायचे एवढंच तालुक्यात केले. मात्र, पंतप्रधान मोदीं यांनी 5 लाखांचे आरोग्यच कवच प्रत्येक भारतीय नागरिकाला दिले आहे, असं विखे म्हणाले.

नगर जिल्ह्याचे सर्वात जास्त नुकसान पवार साहेबांनी केले आहे, असं विधान करत विखेंनी शरद पवारांनाही लक्ष्य केलं. चक उबाठा म्हणजे ऊब आली आहे. काँग्रेसचा फुफाटा झाला आहे. यांना धडा शिकविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना निवडून द्यायला पाहिजे, असं आवाहनही विखेंनी केलं.

 

follow us