मतदारांनी ‘लक्ष्मी’ स्वीकारावी अन् मतदान करावे; प्रतिभा धानोरकरांचे वादग्रस्त विधान

मतदारांनी ‘लक्ष्मी’ स्वीकारावी अन् मतदान करावे; प्रतिभा धानोरकरांचे वादग्रस्त विधान

Pratibha Dhanorkar : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. आता काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. चंद्रपूर भाजपचे उमेदवार काँग्रेस हे लक्ष्मीदर्शन करून कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेत आहेत. त्यामुळे मतदारांनी लक्ष्मी स्वीकारावी आणि मतदान करावे, असे वादग्रस्त विधान धानोरकर यांनी केले.

पुन्हा राजकीय भूकंप! धैर्यशील मोहिते आणि रामराजे निंबाळकर ‘तुतारी’ फुंकणार? 

इंपेरियल पॅलेसमध्ये इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मेळावा झाला. यावेळी बोलताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार मुकुल वासनिक, खासदार चंद्रकांत हंडोरे, जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी आमदार वामनराव कासावार आदी उपस्थित होते. यावेळी संबोधित करताना धानोरकर यांनी महायुतीचे उमेदवार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावरही टीका केली.

SECR Recruitment : रेल्वेत विभागात बंपर भरती सुरू, 10 वी पास उमेदवारही करू शकतात अर्ज 

धानोरकर म्हणाल्या, चंद्रपुरातील भाजपचे उमेदवार पैशाच्या बळाचा वापर करत आहेत. याच पैशाच्या जोरावर भाजप काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेत आहे. तेव्हा मतदारांनी या निवडणुकीत मिळालेली लक्ष्मी स्वीकारावी. त्यांनी या चालून आलेल्या लक्ष्मीला परत करू नये आणि काँग्रेसलाच मतदान करावे, असे आवाहन केले.

धानोरकर यांनी सरळ सरळ पैसा स्वीकारा असं सांगितल्यानं उलट सुलट चर्चाही सुरू झाली

धानोरकर पुढे म्हणाल्या की, मी रडणारी नाही तर लढणारी आहे. मी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते, तेव्हा इंडिया आघाडीच्या रॅलीत जनसागळ उसळल्याचा उल्लेखही त्यांनी येथे केला.

दरम्यान, धानोरकर यांनी केलेल्या टीकेला आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवर काय प्रत्युत्तर देणार हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube