Download App

पाणी मागणी अर्जासाठी मुदतवाढ, शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, आमदार काळेंचं आवाहन

गोदावरी कालव्यातील 7 नंबर पाणी मागणी अर्जासाठी मुदत वाढल्याने शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करण्याचं आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केलं.

MLA Aashutosh Kale : गोदावरी कालव्यातील 7 नंबर पाणी मागणी अर्जासाठी मुदत वाढल्याने शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करण्याचं आवाहन आमदार आशुतोष काळे (Aashutosh Kale) यांनी केलंय. गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम 2024-25 साठी पाटबंधारे विभागाकडून जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आलंय. रब्बी हंगामातील पिकांसाठी पाटबंधारे विभागाकडून डाव्या-उजव्या कालव्यांना 7 नंबर पाणी मागणी अर्जावर आवर्तन देण्याचे जाहीर करण्यात आलंय. त्यानूसार शेतकऱ्यांनी अर्ज करावे, असं आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केलंय.

माझ्या विजयात ‘त्यांच्याच’ कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा…आमदार झाल्यानंतर अमोल खताळ यांची पहिलीच प्रतिक्रिया

पाटबंधारे विभागाने गोदावरी कालव्यांचे रब्बी हंगाम 2024-25 साठी 7 नंबर पाणी मागणी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यासाठी केलेल्या सूचनेवरून लाभधारक शेतकऱ्यांना 5 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज दाखल न केलेल्या उर्वरित लाभधारक शेतकऱ्यांनी आपले ७ नंबर पाणी मागणी अर्ज तातडीने दाखल करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

एकनाथ शिंदे यांचे मध्यरात्री शिवसैनिकांना भावनिक आवाहन; मुख्यमंत्रीपदाबाबत साशंकता कायम

गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम २०२४-२५ साठी पाटबंधारे विभागाकडून जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात येऊन रब्बी हंगामातील पिकांसाठी पाटबंधारे विभागाकडून डाव्या-उजव्या कालव्यांना सात नंबर पाणी मागणी अर्जावर आवर्तन देण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. त्यानुसार 14 नोव्हेंबरपर्यंत पाणी मागणी अर्ज भरणे लाभधारक शेतकऱ्यांसाठी बंधनकारक होते.

यशवंतराव चव्हाणांचा सुसंस्कृत राजकारणाचा वारसा जपतच पुढची वाटचाल असणार; डॉ. अतुलबाबा भोसलेंची ग्वाही…

ही मुदत संपल्यामुळे काही लाभधारक शेतकरी मात्र आपले अर्ज मुदतीच्या आत दाखल करू शकले नाहीत. त्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये, यासाठी आमदार काळे यांनी पाटबंधारे विभागाला 7 नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचनेनुसार पाटबंधारे विभागाकडून 5 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस; अदाणी, मणिपूर प्रकरणारून विरोधक आक्रमक

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले नसतील त्यांनी आपला पाणी मागणी अर्ज संबंंधित विभागाकडे दाखल करावा, असं आवाहन आमदार काळेंकडून करण्यात आलंय.

follow us