Download App

Kishor Patil Audio Clip : ‘होय, मी शिव्या दिल्या’; आमदार किशोर पाटलांची कबुली

  • Written By: Last Updated:

जळगाव : जळगावातील पाचोरा येथील शिवसेना गटाचे आमदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे निकटवर्तीय किशोर पाटील (Kishor Patil) यांनी मतदार संघातील एका पत्रकाराला फोन वरून अश्लील शिवीगाळ केली. या शिवीगाळीची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. त्यामुळं पाटील यांची व्हिडिओ क्लिप जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान या क्लिपला आमदार किशोर पाटील यांनी दुजोरा दिला असून ती क्लिप माझीच असल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं. त्यांच्या या भूमिकेमुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या. (MLA kishor patil says yes i insulted journalist)

भडगाव तालुक्यातील एका गावातील पीडित अल्पयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्यानं जळगाव जिल्हा हादरला. या घटनेच्या निषेधार्थ काल मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा दरम्यान आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबाशी संवाद साधला. या घटनेचं वार्तांकन करतांना एका पत्रकाराने मुख्यमंत्र्यावर टीका केली होती. पत्रकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत चमकोगिरी असा शब्द वापरला होता. याच घटनेवरून आमदार किशोर पाटील आणि संबंधित पत्रकार यांच्याशी फोनवरून एकमेकांमध्ये संवाद झाला. यावेळी पत्रकाराला फोनवर बोलतांना किशोर पाटील यांनी पत्रकाराला अश्लील शिवीगाळ केली. त्याच शिवीगाळीची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

रस्त्याच्या भूमिपूजनावरूनच आजी-माजी आमदार भिडले, जुन्नरच्या आमदारांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर 

दरम्यान ही ऑडिओ क्लिप निश्चितपणे माझीच आहे, हे सांगतांना मला दु:ख होत नाही. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मी जे केलं ते सत्य सांगण्याची माझ्यामध्ये हिंमत आहे. अख्खा महाराष्ट्र या घटनेसंदर्भात पीडित मुलीच्या घरच्याचं सांत्वन करत आहे. मुख्यमंत्र्यांकडूनही या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली, मुख्यमंत्र्यांनी स्वतः फोनवरून पीडित कुटुंबीयांचं सांत्वन करत आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल, अशी ग्वाही दिली. याला संबंधित पत्रकार हा मुख्यमंत्र्यांची चमकोगिरी असे म्हणत असेल तर ही कुठली पत्रकारिता? असा सवाल त्यांनी केला. घटनेसंदर्भात संबंधित पत्रकाराला गांभीर्य नाही, म्हणून मी पत्रकाराला शिव्या दिल्या आहेत, अशी कबुलीसुद्धा पाटील यांनी दिली.

सौम्य शब्दातही हे सांगता आलं असतं असं विचारल्यावर आमदार पाटील म्हणाले की, अशा लोकांना सौम्य शब्दात समजत नाही. ज्या भाषेत यांना समजतं, त्याच भाषेत मी सांगितलं. घटना नेमकी काय आहे, मुलगी सात वर्षांची मात्र तरीही, ती सोडून नेमका संबंधित पत्रकार हा पालकांनी मुलीकडे लक्ष दिले पाहिजे, मुली तासनतास फोन वर बोलतात असा सल्ला देतोय. ही सल्ला देण्याची वेळ आहे का? ही सात वर्षांची मुलगी फोन वर बोलत होती का.? एवढं जर गांभीर्य अशा पत्रकाराला नसेल तर मी त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम केलं आहे. त्याला जे वाटत असेल त्याने ते करावं असं आमदार किशोर पाटील यांनी म्हटलं आहे.

Tags

follow us