अहमदनगर : कृषी उत्पन्न बाजार समिती, राहुरीच्या उपबाजार समिती (Rahuri Upmarket Committee), वांबोरी येथे संपूर्ण आवारात स्वनिधीतून काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. या विकासकामासाठी सुमारे ३ कोटी ८१ लक्ष रुपयांचा खर्च येणार आहे. या विकास कामाचा आज शुभारंभ केला. याशिवाय, आजवर अनेक रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले. भले मी कधी उद्घाटनांचे घाट घातले नाहीत, मात्र कामाची यादी बरीच मोठी आहे, अशा शब्दात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी विरोधकांवर हल्ला केला.
Manoj Bajpayee: मनोज बाजपेयींचा ‘भैय्या जी’ या चित्रपटाचा सोनी मॅक्सवर भव्य प्रीमिअर
काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ आमदार तनपुरे यांच्या हस्ते झाला. यावेळी शेतकरी मेळाव्याचे देखील आयोजन केले होते. यावेळी बोलतांना तनपुरे म्हणाले की, वर्षभरापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली. यात आपण जो विश्वास टाकला, त्या विश्वासाला पात्र राहून अरुण बाबुराव तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांची घोडदौड सुरू आहे. शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या बाजार समितीची गणना आदर्श मार्केट कमिटी म्हणून व्हावी हा आपला प्रयत्न राहील. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आतापर्यंत घेतले गेले आहेत. यापुढे देखील ही परंपरा सुरू राहील, असा विश्वास तनपुरेंनी व्यक्त केला.
टेनिसपटू राफेल नदालचा टेनिसला अलविदा, निवृत्तीच्या घोषणेनं चाहत्यांना धक्का
पुढं ते म्हणाले, माझ्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीत आणि आमदार म्हणून वांबोरीच्या विकासासाठी नेहमीच प्राधान्याने काम केले. यापुढे देखील करत राहील. वांबोरी सब स्टेशनवरील भार कमी करण्यासाठी नवीन सबस्टेशनची निर्मिती केली. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजनेच्या माध्यमातून आपण प्रकल्प हाती घेतला. सरकार बदलल्यामुळे त्यास विलंब झाला. अनेक रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले. भले मी कधी उद्घाटनांचे घाट घातले नाहीत मात्र कामाची यादी बरीच मोठी आहे, असं ते म्हणाले.
केंद्र सरकारकडून सहकारासंबंधी जाचक निर्णय…
यावेळी बोलतांना तनपुरेंनी केंद्र सरकारवरही टीका केली. केंद्र सरकारकडून सहकारासंबंधित अनेक जाचक निर्णय घेतले जात आहेत. मात्र जोपर्यंत लोकांचा सहकारी संस्थांवर विश्वास आहे, तोपर्यंत संस्था हार मानणार नाही. भविष्यात येणाऱ्या स्पर्धेला तोंड देत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पारदर्शीपणे व्यवहार सुरू रहावा, त्यातून शेतकऱ्यांचे हित साधावे, यासाठी बाजार समिती कटिबद्ध राहील, असंही तनपुरे म्हणाले.