Manoj Bajpayee: मनोज बाजपेयींचा ‘भैय्या जी’ या चित्रपटाचा सोनी मॅक्सवर भव्य प्रीमिअर

Manoj Bajpayee: मनोज बाजपेयींचा ‘भैय्या जी’ या चित्रपटाचा सोनी मॅक्सवर भव्य प्रीमिअर

Bhaiyya Ji Movie Grand Premiere: ‘भैय्या जी’ या ॲक्शन पॅक्ड थरारापटाद्वारे प्रेक्षकांना जबरदस्त थराराचा अनुभव देण्यासाठी सोनी मॅक्स ही भारताची प्रिमियर हिंदी चित्रपट वाहिनी सज्ज आहे. मनोज बाजपेयी या कसलेल्या नटाची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात रहस्य, नाट्य आणि भरपूर ॲक्शन दृश्ये यांनी भरलेले कथानक आहे. सोनी मॅक्सवर या चित्रपटाच्या प्रिमियरच्या आधी मनोज बाजपेयीने राम चरण त्रिपाठी ही जटिल व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करण्याचा आपला अनुभव सांगितला.

तो म्हणतो, “भैय्या जी साकारण्यासाठी विशेष शरीरिक क्षमतेची आवश्यकता होती. यातल्या थरारक दृश्यांचे चित्रीकरण सलग वीस दिवस चालले आणि ती दृश्ये करताना मी अनेकदा जखमी झालो. पण कसेही करून ते चित्रीकरण पूर्ण करण्याचे आम्ही ठरवले होते. त्यामुळे मला झालेल्या इजा चित्रीकरणाच्या आड आल्या नाहीत.

मनोज बाजपेयीने स्वतःचे सगळे स्टंट स्वतः करण्याचा निर्णय घेतला. यातून त्या भूमिकेविषयीची त्याची वचनबद्धता दिसून येते. तो म्हणतो, “ही व्यक्तिरेखा मला जिवंत करायची होती. मी आता विशीतला किंवा तिशीतला नसलो, तरीही हे आव्हान घ्यायचं, असं मी ठरवलं. हे अवघड आव्हान होतं, पण मी ते पेलू शकलो याचा मला आनंद वाटतो.”

‘भैय्या जी’ चित्रपटात ताकद, इमानदारी आणि कृतींचे परिणाम यांच्यातील गुंतागुंत दाखवली आहे. प्रेक्षकांसाठी ही एक थरारक सफर असेल. चित्रपटाचे वेधक कथानक आणि मनोज बाजपेयीचा दमदार अभिनय प्रेक्षकांची उत्कंठा वाढवेल यात शंका नाही. मनोज बाजपेयीच्या जबरदस्त अभिनयाला साथ देणारे भागीरथी, झोया हुसैन आणि विपिन शर्मा वगैरे गुणी कलाकार या चित्रपटात आहेत.

Bhaiyaa Ji : खुशखबरी! ‘भैय्या जी’ची रिलीज डेट आली समोर, सेटवरुन आला मनोज बाजपेयीचा फोटो समोर
‘भैय्या जी’ चित्रपटाविषयी 

मनोज बाजपेयीच्या ‘भैय्या जी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व सिंग कार्की यांनी केले आहे. मनोज बाजपेयी यांच्या ‘सिर्फ एक बंदा इनफ है’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. तर चित्रपटाची कथा दीपक राजाराणी यांनी लिहिली आहे. मनोज बाजपेयीव्यतिरिक्त सुविंदर विकी, जतिन गोस्वामी, विपिन शर्मा आणि झोया हुसेन हे कलाकार या चित्रपटात दिसत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ११.५२ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट २४ मे २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube