डिजे लावून करायचे काय? आमदार संग्राम जगताप यांचा विरोधकांवर निशाणा, प्रभाग एकमध्ये जोरदार सभा

Mla Sangram Jagtap : प्रत्येक सण-उत्सव साजरा झाला पाहिजे मात्र, त्यापासून कोणाला त्रास व्हायला नको. डिजे लावून करायचे काय?

Sangram Jagtap Sabha Ward 1

Sangram Jagtap Sabha Ward 1

Mla Sangram Jagtap : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाचे उमेदवार संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, ज्योती गाडे, दिपाली बारस्कर कधीही डिजे लावून मिरवणूक काढत नाहीत. मात्र, काही जागतिक पातळीवरील पक्ष आहेत. त्यांचे उमेदवार अशी मिरवणूक काढतात. ज्योती ढवणही कोणतीच मिरवणूक काढणार नाहीत. प्रत्येक सण-उत्सव साजरा झाला पाहिजे मात्र, त्यापासून कोणाला त्रास व्हायला नको. डिजे लावून करायचे काय? त्यातून वाद होतात तेच मिटवत बसायचे का? असा सवाल आमदार संग्राम जगताप ( mla Sangram Jagtap) यांनी उपस्थित करत विरोधकांवर जोरदार टीका केली.

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत (Ahilyanagar Municipal Corporation Election) प्रभाग एकमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा झाली. या सभेत आमदार जगताप बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, ज्योती गाडे व दिपाली बारस्कर यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते. 

आमदार जगताप म्हणाले, पूर्वी हायवेपर्यंतच व्याप्ती होती मात्र, आता नागापूर गावठाणचा भागही त्यात समाविष्ट झाला आहे. दुसरीकडे पाईपलाईन हाडकोपर्यंत या प्रभागाची व्याप्ती झाली आहे. 2018च्या निवडणुकीत नागापूर गावठाण नव्हतं. राजनंदिनी हॉटेलपर्यंत या प्रभागाची व्याप्ती होती. महिलांच्या दृष्टीने महत्त्वाची सुधारणा म्हणजे या भागातील पाण्याचा प्रश्न 99 टक्के सुटला आहे. भिस्तीबाग महाल परिसरात उद्यान तयार होणार आहे. या भागाचे सुशोभिकरण होणार आहे. ते अहिल्यानगर शहरातील सर्वात मोठे उद्यान असेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 

ते पुढे म्हणाले, शहरात पत्रकार चौक ते जिल्हा पोलीस अधीक्षक चौक रस्त्याचे काँक्रीटीकरण झालं. दुभाजकाचे काम सुरू आहे. दिल्ली गेट ते नेप्तीनाका रस्त्याचे काँक्रीटीकरण झाले. तेथे पथदिवे लावण्याचे काम सुरू आहे. याच प्रमाणे प्रभाग एकमध्येही विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत. गुलमोहर रस्ता, संत नामदेव चौक, भिस्तबाग चौक, एकविरा चौक या रस्त्यांचेही काँक्रीटीकरण शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. तपोवन ते पाईपलाइन ते टेलिफोन एक्सचेंजपर्यंतचा रस्ताही काँक्रिटीकरण होत आहे. तोफखाना पोलीस ठाणे ते भिस्तबागपर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण करायचा आहे. स्वातंत्र्य मिळाल्या पासून तपोवन रस्त्याला डांबरीकरण झाले नव्हते. या रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. आपल्याला विकासकामे पुढे न्यायची आहेत. त्यासाठी निवडणूक लढत आहोत. पद मिळावे यासाठी आम्ही निवडणूक लढत नाही. त्यासाठी जनतेला वेळ द्यावा लागतो. 2018 मध्ये तपोवन रस्त्याच्या डांबरीकरणाचा संकल्प केला होता. येत्या पंचवार्षिक मध्ये आपला संकल्प आहे की, तपोवन रस्त्याचे काँक्रिटीकरण करायचे आहे. ज्या भागात जास्त प्रगती होते तेथेच लोकवस्ती वाढत असते, असे त्यांनी सांगितले.

Exit mobile version