Download App

संग्राम जगताप हॅट्रिक मारणार? महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अहमदनगर विधानसभा मतदारसंघासाठी आमदार संग्राम जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलायं.

Mla Sangram Jagtap : अहमदनगर विधानसभा मतदारसंघातून (Ahmednagar Assembly Constituency) महायुतीकडून आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी आज महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केलायं. यावेळी बोलताना नगर शहराच्या विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवून पुढील 5 वर्षांत नगरचा कायापालट करणार असल्याचा संकल्प आमदार संग्राम जगताप यांनी केलायं. यावेळी भाजपचे समन्वयक भैय्या गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, गणेश भोसले, शिवसेना जिल्हाध्यक्ष अऩिल शिंदे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, प्रा. माणिक विधाते, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

राहुरीत शिवाजीराव कर्डिलेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आमदार जगताप म्हणाले, विधानसभेची निवडणूक विकासाच्या कामावर लढवली जात असून सर्वांना बरोबर घेऊन जनतेचे आशीर्वाद घेतले जातील. निवडणूक लढवत असताना गेल्या दहा वर्षांमध्ये केलेली विकासकामे जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम केलंय. आपल्या शहराबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विकासाच्या योजना राबवत असून जनतेच्या मतरुपी आशीर्वादामुळे माझा विजय निश्चित असून पुढील 5 वर्षात विकास कामातून शहराचा कायापालट करणार असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्ट केलंय.

झारखंडमध्ये बदललाय घराणेशाहीचा ट्रेंड; मुलगा नाही तर सूना सांभाळताहेत राजकीय वारसा

यावेळी सचिन जाधव, किशोर डागवाले, अविनाश घुले, संजय चोपडा, रवींद्र बारस्कर, अमोल गाडे, अरविंद शिंदे, संजय ढोणे, सतीश शिंदे, अजय चितळे, उदय कराळे, नरेंद्र कुलकर्णी, अभिजीत खोसे, वैभव ढाकणे, ज्ञानेश्वर काळे, अमित गटणे, मनोज ताठे, अजिंक्य बोरकर, सुमित कुलकर्णी आदी उपस्थित होते.

follow us