Download App

महायुतीत काडी पडलीच! “मला पैशांची ऑफर अन् धमक्या..” आ. कांदेंचे भुजबळांवर गंभीर आरोप

याचिका मागे घेण्यासाठी मला दोन दिवसांपूर्वीच ऑफर देण्यात आली होती. मला पैशांच्या ऑफर दिल्या गेल्या.

Nandgaon News : महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारी याद्या जाहीर झाल्यापासून धुसफूस वाढली आहे. तिकीट मिळेल याची अपेक्षा असताना अनेकांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे या नेत्यांनी आता बंडखोरीची भाषा केली आहे. या राजकीय नाट्यात नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा वाद जरा जास्तच वाढला आहे. या मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी अपक्ष उमेदवारीची घोषणा केली होती. त्यांच्या या भूमिकेवर विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी (Suhas Kande) सडकून टीका केली आहे. तसेच भुजबळांबाबत अनेक गौप्यस्फोट केला आहे.

सुहास कांदे म्हणाले, महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मीच याचिका दाखल केली होती. याचिकेवर अजूनही सुनावणी सुरू आहे. या याचिकेमुळे भुजबळ अडचणीत आहेत. याचिका मागे घेण्यासाठी मला दोन दिवसांपूर्वीच ऑफर देण्यात आली होती. मला पैशांच्या ऑफर दिल्या गेल्या. धमक्याही दिल्या. पण मी काही बदलणार नाही. मी निवडणुकीतून माघार घेतलेली नाही आणि घेणारही नाही. त्यामुळे भुजबळ माझ्यावर चिडलेले आहेत. माझ्यावर असलेला राग काढण्यासाठी अशा पद्धतीने माझ्यावर आरोप केले जात आहेत, असे कांदे यांनी स्पष्ट केले.

मोठी बातमी! समीर भुजबळ यांचा मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा, विधानसभेच्या रिंगणात उतरणार

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांना आयुष्यभर जेलमध्ये बसवायचे हाच माझा संकल्प आहे. यापासून मला कुणीही विचलित करू शकणार नाही, असे कांदे म्हणाले. दरम्यान, समीर भुजबळ यांच्या नांदगाव मतदारसंघातील उमेदवारीवरही त्यांनी भाष्य केलं. भयमु्क्त नांदगाव करण्याची भाषा करणे म्हणजे राक्षसाने सत्यनारायणाची पूजा करण्यासारखे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर परवानगी दिली तर मी येवल्यातूनही निवडणूक लढण्यास तयार आहे, असा इशाराही आमदार सुहास कांदे यांनी यावेळी दिला.

समीर भुजबळांचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. भुजबळ आता नांदगाव  विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे पाठवला आहे. नांदगावमधील नागरिकांची वाढत असलेली मागणी आणि नांदगावमधील दहशतीचे वातावरण बदलण्यासाठी या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय मी घेतला आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुंबई अध्यक्ष पदाचा मी राजीनामा देत आहे. तो आपण स्वीकारावा अशी विनंती समीर भुजबळ यांनी या पत्रात केली आहे.

छगन भुजबळांनी पक्कं ठरवलंय.. यंदा सुहास कांदेंना चेपवायचच!

follow us