Molestation of a minor girl : संगमनेर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या तरुणाने त्याच्या परिचयातील अवघ्या १४ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला दुचाकी शिकवण्याच्या बहाण्याने लज्जा उत्पन्न होईल, असे दुष्कृत्य केले. त्यामुळे पीडित अल्पवयीन मुलीने रविवारी रात्री आपल्या आईसोबत जात शहर पोलीस ठाणे गाठत ‘आपबीती’ कथन केली. त्यावरून शहर पोलिसांनी संतोष रामू धोत्रे या तरुणाविरुद्ध विनयभंगासह बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केले.
मणिपूर हिंसाचार ! 60 लोकांचा मृत्यू तर 1700 घरं जळून खाक…
याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात क्रीडा संकुलाजवळ हा प्रकार घडला. अल्पवयीन मुलीने आरोपीला दुचाकी शिकविण्याची विनंती केली असता आरोपीने तिला दुचाकी चालवण्यास देत तो तिच्या पाठीमागे बसला. काही अंतर गल्यानंतर आरोपी संतोष धोत्रे याने १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला ‘तू मला आवडतेस, तुझें लग्न होत नाही तोपर्यंत माझ्याशी संबंध ठेव, असे म्हणत अल्पवयीन मुलीला लज्ञा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.
झाल्या प्रकाराने घाबरलेल्या पीडित मुलीने तेथेच दुचाकी वरून उतरून घर गाठले आणि झाला प्रकार आईला सांगितला. त्यावर पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आईने शहर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचा आदेश देत संतोष धोत्रे याच्यावर गुन्हा दाखल केला.